Nashik News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळांच्या आणखी एका निकटवर्तीयाचे पुर्नवसन केले आहे. त्यांनी दिलीप खैरे यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. जिकडे भुजबळ तिकडे खैरे अशी प्रतिमा असलेले दिलीप खैरे हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणीत सरचिटणीस होते. त्यांची त्याच पदावर फेरनियुक्ती करीत पुर्नवसन करण्यात आले आहे.
महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष असलेले खैरे हे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे गेली अनेक वर्षे विश्वासू सहकारी आहेत. भुजबळ ज्या पक्षात असतात, त्या पक्षात खैरे असतात. यापूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांना पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी नियुक्त केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भुजबळ यांचा प्रभाव आणखी वाढला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्याकडून खैरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. खैरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या अगोदर विविध महत्वाची पद सांभाळली आहे. पक्षाच्या विविध उपक्रमामध्ये तसेच पक्ष मजबूत करण्यात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा एकदा सरचिटणीसपदी संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात पक्षाचे पाच आमदार आहेत. मात्र, मतदारांत प्रभाव निर्माण करण्याचे मोठे आव्हान या पक्षापुढे आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारविषयी नाराजी आहे. हे आव्हान स्विकारून पक्षाच्या विस्तारासाठी काम करावे लागणार आहे.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.