Shirdi News : बीड मधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप सुरू झाले आहेत. पालकमंत्री पदावर नियुक्ती देऊ नये, अशा देखील आता मागण्या होत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "न्यायालयाने निर्णय दिल्यास दोषी किंवा निर्दोष ठरतो. परंतु मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत फक्त आरोप होत आहेत. आरोप पुढे सिद्ध झाल्यास पक्ष नेतृत्व निर्णय घेण्यास तयार आहे", असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवसंकल्प शिबिर होत आहे. या शिबिराला राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आमदार मंत्री पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी या शिबिराला हजेरी लावली असून तत्पपूर्वी त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत प्रतिक्रिया दिली.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, "न्यायालय दोषी की निर्दोष हे ठरवते. इथं मंत्री मुंडे यांच्याबाबतीत फक्त आरोप होत आहेत. नुसत्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. बीड प्रकरणांमध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे. अजितदादांनी देखील याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे". मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबाबत काही आढळल्यास पक्ष नेतृत्व हमखास भूमिका घेईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील प्रतिक्रिया दिली. 'या निवडणुका महायुतीबरोबर लढण्याची आमची तयारी आहे. याबाबत पुढे काय निर्णय होईल, त्यावरून पक्ष भूमिका घेईल परंतु ह्या निवडणुका स्वबळावर देखील लढण्याची आमची तयारी आहे. तशा सूचना पक्षांच्या स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील दिल्या गेल्या आहेत. पक्षाची दोन्ही बाजूने तयारी आहे', असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
शिर्डीत होत असलेल्या नवसंकल्प शिबिराला राज्यभरातील नेते मंत्री खासदार आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिवराज सहभागी होणाऱ्याला प्रत्येकाला ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. शिबिराच्या प्रवेशद्वारावर आणि शिबिर स्थळी महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मोठे कट-आउट उभारण्यात आले आहे. तसेच शिबिराचा संपूर्ण परिसर स्थळी गुलाबी रंगाला प्राधान्य दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.