Shaktipeeth Expressway : विशाल पाटलांनाही जोर चढला, शक्तिपीठातून सांगलीलाही वगळा, अन्यथा...

Shaktipeeth Expressway Controversy : केंद्र आणि राज्य सरकारचा महत्वकांशी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होताच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळण्यात आले आहे.
Vishal Patil
Vishal Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 18 Jan : केंद्र आणि राज्य सरकारचा महत्वकांशी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Expressway) कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होताच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळण्यात आले. राज्यातील बारा जिल्ह्यातून हा मार्ग जाणारा असून या बारा जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना हा मार्ग जोडला जाणार आहे.

मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातून वाढता विरोध पाहता या जिल्ह्यातून हा महामार्ग वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यातील इतर जिल्ह्यातून विरोध होत असताना त्याला बेदखल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या महामार्गासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, आता हळूहळू इतर जिल्ह्यातूनही तीव्र विरोध होताना दिसत आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याला वगळल्यानंतर आता सांगलीतील नेत्यांनी देखील जोर धरला आहे. खासदार विशाल पाटील यांनी देखील या महामार्गाला विरोध केला असून सांगली जिल्ह्याला यातून वगळण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यातून बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे.

Vishal Patil
Guardian minister controversy : महायुतीमध्ये 'या' चार जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच; प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन कोणाच्या हस्ते?

त्या पद्धतीने सांगली (Sangli) जिल्ह्यालाही वगळावे, ही सरकारला शेवटची विनंती आहे, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशाराच खासदार विशाल पाटील यांनी सरकारला दिला आहे. या महामार्गाला विरोध नसून शक्तिपीठ महामार्गाला रत्नागिरी-नागपूर हा पर्यायी रस्ता आहे. याच महामार्गाला शक्तिपीठ मार्ग जोडावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

या महामार्गासाठी जे शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत अशा जमिनी सरकारने घ्याव्यात. मात्र, ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांच्यावर जबरदस्ती नको. तासगाव आणि मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध आहे, नियोजित शक्तिपीठ हा खरोखरच शक्तिपीठाला जोडणारा रस्ता आहे की दुसऱ्या हेतून निर्माण केलेला रस्ता आहे, अशी शंकाही पाटील यांनी व्यक्त केली.

Vishal Patil
Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडसह 'या' आरोपींची कोठडी आज संपणार, पुढे काय?

शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी देण्याची मानसिकता शेतकर्‍यांची नाही. शेतकर्‍यांनी काबाडकष्ट करून या जमिनी पिकवल्या आहेत. जिरायती जमिनी असल्याने मूल्यांकन कमी होऊन नुकसान भरपाई कमी मिळते. त्या उलट जिरायत नोंदीऐवजी बागायत नोंदी कराव्यात. बागायत नोंदी केल्या तर जमीन देण्याची तयारी देखील शेतकऱ्यांची नाही, असं स्पष्टीकरण देखील विशाल पाटील यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com