Udhav Thackeray, Eknath Shinde, Hemant Godse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori constituency 2024: मुख्यमंत्र्यांचा चिमटा; टोमणे मारण्यापलीकडे उद्धव ठाकरेंना कामच उरले नाही

Sampat Devgire

CM Eknath Shinde news: महायुतीचे डॉ. भारती पवार आणि हेमंत गोडसे यांनी आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप शिवसेना यांचं विविध सहकारी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खास ठाण्याहून आले होते.

नाशिक मतदारसंघातील उमेदवारी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या विषयावरील सर्व वाद्यांवर पडदा पडलेला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सहकारी पक्षांसह अन्य इच्छुक उमेदवार ही एक दिलाने उमेदवाराच्या प्रचारात काम करतील. सर्व घटक एकत्र आलेले दिसतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे उमेदवार गोडसे यांची रॅली शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाजवळ आली असता मशाल पेटवून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. या संदर्भात मुख्यमंत्री यांनी शिवसेना ठाकरे गटाचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, त्यांच्याकडे आता कुठलीही काम उरलेले नाही.

निदर्शने करणे, टोमणे मारणे, टीका करणे, विरोधकांना दिवस ने शेरेबाजी करणे यापलीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतेही काम नाही. राज्यातील सत्ता गेली आहे. नवे सरकार सत्तेत आले आहे. गेली दोन वर्ष ते सरकार काम करीत आहे. हे उद्धव ठाकरे यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे अद्यापही त्यांना सत्तेची स्वप्न पडतात.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सध्या कोणतेही काम नाही. ही निवडणूक संपल्यानंतर अजिबातच काम उरणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी जे उमेदवार उभे केले आहेत, ते एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार आहेत. हे दोन्ही उमेदवार गळ्यात गळे आणि तंगड्या तंगड्या घालून पडणार आहेत. त्यामुळे आम्ही त्याची फारशी चिंता करीत नाही.

एकनाथ शिंदे यांनी गेले दोन वर्ष राज्य सरकार जे काम करीत आहे, त्या आधारे या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. असे विधान देखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणायचे आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे जनता त्यांच्यावर खुश आहे. त्याचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसतो आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या धास्तीने इंडिया आघाडी विखुरली गेली आहे. लाडू फुटावा तसे लाडू फुटून ती सगळी बुंदी आता विखुरली गेली आहे, असा चिमटाही त्यांनी इंडिया आघाडीला घेतला. यावेळी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे हे दोन्ही उमेदवार तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT