Dindori Lok Sabha: 'कांद्या'मुळे अडचणीत आलेल्या डॉ. भारती पवारांच्या 'खासदार'कीची वाट PM मोदी सोपी करणार?

Dindori Lok Sabha Election 2024: डॉ. पवार यांनी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मोदींची सभा यशस्वी करण्यासाठी काय प्रयत्न करायचे याबाबतचे नियोजन झाले.
Dr.Bharati Pawar, PM Narendra Modi
Dr.Bharati Pawar, PM Narendra ModiSarkarnama

Dr. Bharti Pawar news: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency) भाजपने डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांना अद्याप प्रचारात सूर गवसलेला नाही. या मतदारसंघात शेतकरी अत्यंत संतप्त असल्याने भाजपला परिश्रम करावे लागत आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्याचे पडसाद दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक उमटले आहेत.

विरोधी पक्षांनी त्याचा लाभ घेत प्रचार केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या 10 मे रोजी पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी 2014 पासून त्यांची ही तिसरी सभा होत आहे. या सभेचा काय व किती परिणाम होतो याकडे विरोधकांचे विशेष लक्ष आहे.

प्रतिकूल राजकीय परिस्थितीशी सामना करीत असलेल्या डॉ. पवार (Dr.Bharati Pawar) यांना मोदींच्या सभेपासून विशेष अपेक्षा आहेत. त्यामुळे ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी तयारीला लागावे असे प्रयत्न आहेत. या संदर्भात डॉ. पवार यांनी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी काय प्रयत्न करायचे यावर या बैठकीत नियोजन झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. भारती पवार येत्या गुरुवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे डॉ. भारती पवार यांना मोदी यांच्या सभेमुळे अनुकूल वातावरण निर्मिती होऊन प्रचारासाठी आघाडी मिळेल, असा विश्वास आहे. तो कितपत यशस्वी होतो, हे पंतप्रधान मोदी यांच्या सभेतून स्पष्ट होणार आहे.

Dr.Bharati Pawar, PM Narendra Modi
Nashik constituency 2024 : भुजबळांची कोपरखळी : 'आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार'

उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये शिर्डी आणि नाशिकचा (Shirdi and Nashik) अपवाद वगळता उर्वरित सर्व सहा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे (BJP) आहेत. सध्याच्या सर्व म्हणजेच आठ जागा भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे या जागा आपल्याकडे राखण्यासाठी भाजपला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. त्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे या सभेकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com