Dindori Loksabha  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori Loksabha : कांदा निर्यातबंदीचा प्रश्न पेटला, ग्रामस्थांची लोकप्रतिनिधींना गावबंदी!

Loksabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा निर्यातबंदीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. निवडणुकीत शेतकऱ्यांनी याबाबत केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. निर्यातबंदी विरोधात आवाज न उठवणाऱ्या प्रतिनिधींनी मते मागायला येऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

Sampat Devgire

Dindori Political News : कांदा निर्यातबंदीचा प्रश्न नाशिक जिल्ह्यात गंभीर बनला आहे. गेल्या चार महिन्यांपासून केंद्र शासनाने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली आहे. या विषयावर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत चांदवड येथे मोठे आंदोलनदेखील झाले होते. मात्र, निवडणुकीत हा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांना चांगलीच धडकी भरली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori loksabha Constituency )कांदा निर्यातबंदीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. निवडणुकीत शेतकऱ्यांनी (farmers) याबाबत केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. निर्यातबंदी विरोधात आवाज न उठवणाऱ्या प्रतिनिधींनी मते मागायला येऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. माळवाडी येथे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकप्रतिनिधी विरोधात फलक लावले आहेत. मुख्य चौकातच हा फलक लावण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गावातील सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांनी केंद्र शासनाने राबविलेल्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. केंद्र शासनाने निर्यातबंदी करून शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज न उठविणाऱ्या सत्ताधारी तसेच मतदान करायचे की नाही हे आम्ही ठरविणार आहोत. सत्ताधारी आणि विरोधक कोणीही मत मागायला येऊ नये, असे फलक गावात लावण्यात आले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून आर्थिक दुर्दशा झाली आहे. कांद्याची शेती करण्यासाठी लागणारा खर्च बघता त्या प्रमाणात कांद्याला दर मिळत नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यात माळवाडी हे गाव विक्रीस काढण्यात आले आहे, अशी व्यथा व्यक्त केली होती. तरीही शेतकऱ्यांना कोणीही लोकप्रतिनिधी भेटायला आले नाहीत. त्यांनी या प्रश्नावर मौन पाळले. केंद्रातील सरकारच्या विरोधात ज्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला नाही. निर्यातबंदीच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले होते. त्यामुळे त्यांनी आता आमच्या गावात मध्य मागायला येऊ नये. असे आम्ही ठरविले आहे. मतदान कोणाला करायचे याचा विचार आम्ही करणार आहोत, असे अविनाश बागुल या शेतकऱ्याने सांगितले.

किशोर बागुल, शशी शेवाळे, दिलीप शेवाळे यांसह मयूर बागुल, खुशाल बागुल, किशोर बागुल माेठ्या प्रमाणात शेतकरी या वेळी उपस्थित होते. त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला. गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, आरोग्य, शिक्षण आणि महागाई याकडे कोणीही लक्ष देत नाही. कांदा प्रश्नावर राजकारण केले जाते. अशी खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत दिंडोरी मतदारसंघात पुन्हा एकदा कांदा निर्यातबंदीचा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उमेदवारांनी चांगलाच धक्का घेतला आहे.

भाजपची चिंता वाढणार

दिंडोरी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. कांदा निर्यातबंदीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वातावरण पेटलेले असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रचारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात पुन्हा निर्यातबंदीचा विषय निघाल्याने दिंडोरी मतदारसंघाचे राजकारण आणि लोकसभा निवडणूक कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नांवरतीच फिरत राहील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या चिंतेत भर पडली आहे.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT