Nashik News: 'माझी छाती फोडली तर त्यात शरद पवार (Sharad Pawar) दिसतील,' असे म्हणणारे गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेकडे पाठ फिरवल्यामुळे ते शरद पवार गटात नक्की सहभागी होणार असल्याचे चित्र आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र असलेले गोकुळ हे शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. गोकुळ यांनी जनसन्मान यात्रेला (Jansanman Yatra) दांडी मारल्याने नाशिक जिल्ह्यातील राजकारणात चर्चा रंगली आहे. अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
गोकुळ झिरवाळ तुतारी चिन्हावर लढण्यावर ठाम आहेत. मी अजूनही शरद पवार यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे झिरवाळ कुटुंबीय हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाणार अशा चर्चा रंगल्या काही दिवसापूर्वी सुरु होत्या त्यावर खुद्द नरहरी झिरवाळ यांनी मी अजित पवारांसोबत राहणार असल्याचे जाहीर केले.
"गोकुळ झिरवाळ माझा मुलगा आहे. त्याला आमदार करायचे असेल तर मी अजितदादांना सांगेन," असेही नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून रिंगणात उतरणार असल्याचे गोकुळ झिरवाळ काही दिवसापूर्वी सांगितले होते. आज दिंडोरीतील अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला अनुपस्थित राहिल्याने गोकुळ झिरवाळ यांची लढत त्यांचे वडील नरहरी झिरवाळ यांच्यासोबत होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.