Narhari Zirwal & Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ यांचा शरद पवारांकडे ओढा ! अजित पवार गटात होतेय घुसमट ?

Narhari Zirwal politics : झिरवाळ यांचा वाढदिवस आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुमधडाक्यात साजरा होत आहे. अजित पवार गटाचे झिरवाळ यांचा वाढदिवस शरद पवार गटाच्या शेटे यांच्या झाल्याने अंगणात चर्चाना उधाण आले आहे.

Sampat Devgire

Dindori  News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांविषयी विविध वावड्या उठत आहेत. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांच्या बाबतही ही अशीच कुण कुण कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.आमदार झिरवाळ यांच्या विषयी ही चर्चा सुरू होण्याचे निमित्त आहे, त्यांचा आजचा वाढदिवस. झिरवाळ यांचा वाढदिवस आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुमधडाक्यात साजरा होत आहे. त्यानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रमच बऱ्याचसा सूचक आणि कार्यकर्त्यांमध्ये नवी चर्चा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे.

झिरवाळ उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आहेत. मात्र त्यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम जेष्ठ नेते श्रीराम शेटे अध्यक्ष असलेल्या कादवा कारखान्याच्या प्रांगणात होत आहे. शेटे तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि मतदारांवर मोठा प्रभाव असलेले नेते आहेत. ते शरद पवार यांचे विश्वासू सहकारीही आहेत. सहकारात पक्ष नसतो मात्र झिरवाळ यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम शरद पवार यांना मानणाऱ्या नेत्यांच्या उपस्थितीत होत असल्याने झिरवाळ अजित पवार गटात अस्वस्थ तर नाही ना? या चर्चेला निमित्त ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदार संघाच्या प्रचाराची जबाबदारी शेटे यांच्यावरच होती. या निवडणुकीत प्रचारादरम्यान झालेल्या एक कार्यक्रमात देखील आमदार झिरवाळ हे शरद पवार गटाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार गटातील जे आमदार घरवापसीच्या तयारीत आहेत, त्यात झिरवाळ तर नाही ना? असा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीत या मतदासंघात भाजपच्या डॉक्टर भारती पवार यांना ५५ हजार ८८१ मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांना एक लाख ३८ हजार १८९ मते मिळाली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नरहरीजीरवळ आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सर्वाधिक ८२ हजार मतांनी आघाडीवर होता.

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दिंडोरी मतदार संघाविषयी गंभीर आक्षेप आहेत. नरहरी झिरवाळ हे अजित पवार गटाचे आहेत. विधान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.  तरीही भारतीय जनता पक्षाला अपेक्षित मतदान मिळवून देण्यात त्यांनी पुरेसे प्रयत्न केले नाहीत, अशा आशयाची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT