Raj Thackrey : प्रदीर्घ काळानंतर राज ठाकरे नाशिकला, मात्र प्राधान्य देवदर्शनाला!

Raj Thackrey On Nashik tour : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बुधवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा लोकसभेच्या निवडणुकांनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Nashik News, 18 June : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बुधवारी (ता. 19 जून) रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे ते कार्यकर्त्यांना काय सूचना करतात याची उत्सुकता लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे प्रमुख राज ठाकरे निवडणुकीच्या निकालानंतर नाशिकला येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे यांनी महायुतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. स्वबळावर निवडणुका लढविण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

राज ठाकरे नाशिकला (Nashik) आल्यानंतर गुरुवारी ते त्र्यंबकेश्वर येथे देव दर्शनासाठी जातील. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेणार आहेत. संत निवृत्तीनाथांच्या दिंडीचं गुरुवारी प्रस्थान होणार आहे. त्यामध्ये राज ठाकरे सहभागी होणार आहेत.

Raj Thackeray
Sanjay Raut : राऊतांनी राजकारणात आणला ट्विस्ट; म्हणाले, ...तर भुजबळ 'मुख्यमंत्री'पदाचा टिळा लावूनच बाहेर पडले असते!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा होत आहे. मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा कार्यक्रमात देवदर्शनाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर ते शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. या बैठकीत ते विधानसभा निवडणुकीबाबत काय संदेश देतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

Raj Thackeray
Ajit Pawar : अजित पवार गटामुळे झाला दिंडोरीत भाजपचा पराभव?

ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत स्वबळाची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात त्या दृष्टीने पक्षाची तयारी अद्याप सुरू झालेली नाही. नाशिक शहरात पक्षाचे विविध पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ठाकरे या इच्छुकांना भेटतात की नाही. भेटल्यास त्यांना काय सूचना करतात, हा मनसेबरोबरच अन्य राजकीय पक्षांसाठीही उत्सुकतेचा विषय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com