Girish Mahajan & Dinkar Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Municipal Corporation : नगरसेवक मुलगा महिनाभरापासून जायबंदी; आता भाजप नेते दिनकर पाटील महापालिका प्रशासनाला कोर्टात खेचणार

Dinkar Patil, Nashik Potholes : नाशिक महापालिका प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांनी घेतला आहे. त्यांचा मुलगा अमोल महिनाभरापासून रुग्णालयात आहे.

Ganesh Sonawane

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेचे माजी सभागृहनेते व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील महापालिका प्रशासनाविरोधात न्यायालयात धाव घेणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या अपूर्णावस्थेतील कामांमुळे आणि त्यामुळे दुरावस्था झालेल्या रस्त्यामुळे रोजच ठिकठिकाणी अपघातांची मालिका सुरु आहे. खड्ड्यांमुळे नाशिक शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत पाच जणांचा बळी खड्ड्यांनी घेतला आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, राज्य शासनाने 9 जुलै रोजी राज्यातील सर्व महापालिकांना पत्र दिलं होतं. न्यायालयाच्या एका आदेशान्वये पंधरा दिवसात खड्डे बुजविण्याचे आदेश सरकारने महापालिकांना दिले होते. परंतु अद्यापही शहरातील खड्डे बुजविले जात नसल्याने दिनकर पाटील यांनी महापालिका प्रशासनाविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनकर पाटील यांचा मुलगा अमोल पाटील देखील नगरसेवक आहे. ५ जुलै रोजी अमोल यांचा खड्ड्यांमुळे अपघात झाला. औद्योगिक वसाहतीतील मर्फी चौकात युटिलिटीसंदर्भातील कामे करण्यात आली होती. या ठिकाणी लँड फिलिंग करण्यात आले; मात्र पावसाच्या पाण्यामुळे भरावातील माती वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी येथे तब्बल ५० फूट खोल खड्डा पडला असून, त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अमोल पाटील मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर प्रशासनाने तातडीने जेसीबी मागवून उपाययोजना सुरू केली. मात्र, काम सुरू असताना जेसीबीच्या बकेटचा धक्का लागल्याने अमोल पाटील जखमी झाले. अपघातानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने ते गेल्या महिनाभरापासून जायबंदी आहेत.

अपघातानंतर लोकप्रतिनिधी असूनही प्रशासनाकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही. "लोकप्रतिनिधीचीच ही अवस्था असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची दखल कोण घेणार?" असा सवाल दिनकर पाटील यांनी उपस्थित केला. शासनाने आदेश काढूनही पंधरा दिवसात खड्डे बुजविले जात नाही. मला भरपाई नको. परंतु प्रशासनाच्या मुजोरपणाला कायदेशीर धडा शिकविण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे दिनकर पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT