Girish Mahajan & Dinkar Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: मनसेत दाखल झालेल्या दिनकर पाटील यांनी गिरीश महाजन यांना सुनावले खडे बोल!

Dinkar Patil;Dinkar Patil challenged Girish Mahajan as soon as he joined MNS-पूर्वाश्रमीचे भाजप नेते दिनकर पाटील यांनी आपल्याला भाजपने फसवल्याचा आरोप केला.

Sampat Devgire

MNS Vs BJP News: महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते दिनकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी दिली. विधानसभेच्या उमेदवारीवरून त्यांचा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी वाद झाला. त्यानंतर दिनकर पाटील यांनी सातत्याने विविध आरोप करून भाजपला हैराण केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा नुकताच मुंबईत झाला. या मेळाव्याला पक्ष कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. राज ठाकरे यांच्या भाषणालाही राज्यभर कार्यकर्ते आणि नागरिकांनी दाद दिली. या मेळाव्यातील आणि एक भाषण चर्चेचा विषय आहे.

या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी मनसेत दाखल झाल्यावर पहिल्यांदाच मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने समर्थकांना मुंबईला नेले होते. यावेळी आलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीष महाजन यांना थेट आव्हान दिले आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात ते म्हणाले, आमच्याकडे एक संकटमोचक आहेत. सगळेच त्यांना घाबरतात. मात्र मी त्यांना घाबरत नाही. त्यांना पुरून उरेल. कारण आता महापालिकेत भाजप नवे तर मनसेची सत्ता येणार आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहराचा विकास करू.

ते म्हणाले, मी गेली ४५ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. ३४ वर्ष काँग्रेस पक्षात होतो. अकरा वर्ष भारतीय जनता पक्षात काम केले. मात्र भारतीय जनता पक्षाने मला काहीही दिले नाही. हा पक्ष प्रत्येकाला फसवतो. भाजप हा लबाड पक्ष आहे. कोणीही त्या पक्षात जाऊ नये.

भारतीय जनता पक्ष फक्त आपले मंत्रिमंडळातील सहकारी आणि त्यांच्या बगलबच्चांचे हित साधत असतो. त्यांनी आतापर्यंत कोणालाही काहीही दिले नाही. जाती-जातीत आणि व्यक्ती व्यक्तीत भांडणे लावून आणि राज्यात दंगली घडवून ते राज्य करीत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निवडणूक मतदान यंत्र मॅनेज करून निवडणूक जिंकल्याचा आरोप, पाटील यांनी केला.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT