Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या आखाड्यात शरद पवार पक्षाची उडी, केली मोठी मागणी; नवा वाद उफाळण्याची शक्यता

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आलेल्या एका मागणीवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : प्रयागराज येथील कुंभमेळ्याची सांगता झाल्यानंतर आता पुढचा सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये नाशिकमध्ये होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी आत्तापासूनच सुरु झाली आहे. मात्र त्याआधीच नामकरण आणि शाही स्नानाच्या अधिकारावरून साधू-संतांमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

या वादावर पडदा टाकताना केवळ नाशिक कुंभमेळा न म्हणता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक-त्र्यंबकेश्वर असं नाव सर्व ठिकाणी दिलं जाईल असा निर्णय घेतल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पण, नामांतराचा एक वाद मिटत नाही तोच दुसरा वाद आता उफाळून आला आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आलेल्या एका मागणीवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन येथील मैदानाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीचे नाव न देता त्या मैदानाचे कुंभमेळा मैदान म्हणून कायमस्वरुपी नामकरण करावे. तसेच या नावाचा फलक देखील लावण्यात यावा. जेणेकरुन कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटक व यात्रेकरुंना समजेल की या ठिकाणापासून कुंभमेळ्याला दरवर्षी सुरुवात होते. अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहर जिल्हा कार्याध्यक्ष किरण पानकर, वाहतूक तालुकाध्यक्ष विलास धात्रक, उत्तर महाराष्ट्र ओबीसी उपाध्यक्ष चेतन जगताप, पंचवटी ओबीसी अध्यक्ष ललित ठेंगे, उपाध्यक्ष सुनील ओसवाल, लेवेश ठेंगे, दीपक कुलकर्णी, निखिल गायकवाड, रोहन जगताप, शुभम सांगळे, राहुल काळे, किशोर फसाळे आदींनी हे निवेदन दिलं.

या मैदानावर अनेक साधू-महंत यांचे वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे साधू-महतांच्या नावावरुनच या मैदानाची ओळख असायला हवी अशी लोकांची इच्छा होती. त्यामुळे तपोवनातील मोकळ्या मैदानाला साधुग्राम(कुंभमेळा)मैदान म्हणून घोषित करा तसेच मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

NCP Sharad Pawar
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारातील फहीम खान याचे लखनौ कनेक्शन; हिंदू नेत्याच्या हत्येशी संबंध

वादाची नवी ठिणगी

नाव बदल्याणी मागणी करताना पंचवटीतील तपोवन येथील याच मैदानात वेगवगेळ्या राजकीय पक्षांच्या सभादेखील होत असतात असं राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. त्यांचा अप्रत्यक्ष निशाणा भारतीय जनता पार्टीकडे जातो. कारण, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा या मैदानावर झाली आहे.

त्यावेळी अनेकांनी या मैदानाचा नामोल्लेख करताना मोदी मैदान असा केला होता. संबंधित मैदानाला कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न देता कायमस्वरुपी कुंभमेळा मैदान असे नामकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केल्याने आता भाजप पक्षाच्या वतीने यावर काय भूमिका घेतली जाते ते पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com