Girish Mahajan News
Girish Mahajan News 
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan News : महाजन पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच पक्ष प्रवेशाची चर्चा; अशी काय जादू आहे त्यांच्याकडे...

कैलास शिंदे

Jalgaon Politics Girish Mahajan News : राज्यातील काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते अशोक चव्हाण,अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे,विशेष म्हणजे या दोन्ही जिल्ह्यात भाजपचे संकटमोचक नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) पालकमंत्री आहेत,त्यामुळे याचे नेमके गुपित काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे राजकीय मुत्सद्देगिरीत तरबेज असल्याचे सांगितले जाते. त्यांनी अनेक वेळा याची चुनक ही दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर करून खळबळ उडवून दिली. त्याच्या मागचे सूत्रधार महाजन असल्याचे सांगितले जाते. तर अनेक राजकीय पेचातून त्यांनी भाजप सरकारला बाहेर काढले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू मानले जातात. त्यामुळे पक्ष्यांच्या अनेक मोहिमांची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाते.

आताही नाशिक पदवीधर मतदार संघात जो उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे, त्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी त्या त्या जिल्ह्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न केले. धुळे येथे पालकमंत्री असताना तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनाही त्यांनी भाजपमध्ये आणले. तर नाशिकचे पालकमंत्री असतानाही त्यांनी तेथे भाजपमध्ये मोठे ईनकमिंग केले होते. शिंदे-फडणवीस सरकामध्ये त्यांच्याकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड, तर काँगेसचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय त्यांच्याकडे धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे. नांदेड येथे अशोक चव्हाण, तर लातूर येथे अमित देशमुख आमदार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाजन यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारताना हे दोन्ही जिल्हे भाजपमय करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे महाजन यांच्याकडे हे दोन्ही जिल्हे पालकमंत्री म्हणून देणे ही फडणवीस यांची ठरवून केलेली रणनिती आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळेच आता या दोन्ही जिल्ह्यातील या काँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र येत्या काही दिवसात हे गुपित निश्चित उघड होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT