Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द; कोर्टाने ठोठावला 'एवढा' दंड

Parli Court : सतत गैरहजर राहिल्याने कोर्टाने राज ठाकरेंना वॉरंट बजावले होते
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट परळी कोर्टाने रद्द केले आहे. यावेळी राज ठाकरे यांना कोर्टाने 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ठाकरे प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याविरुद्धचे वॉरंट रद्द करण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. त्यानंतर कोर्टाने दंड ठोठावत त्यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट रद्द केले.

चिथावणीखोर वक्तव्य आणि‎ मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेकी प्रकरणी सतत गैरहजर राहिल्याने परळी कोर्टाने (Parli Court) ठाकरेंना वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते आज जामीन घेण्यासाठी कोर्टात हजर झाले.

राज ठाकरे हे हेलिकॉप्टरने सकाळी दहा वाजता पांगरी येथील गोपीनाथ गड येथे आले. त्यानंतर ते परळी कोर्टात हजर झाले. कोर्टाने अटक वॉरंट रद्द केल्यानंतर आता ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुपारी दीड वाजता मुंबईला रवाना होणार आहेत.

Raj Thackeray
Jalgaon News; खनिज वाहतूकीतील राजकीय वर्चस्व अडचणीत येणार?

२००८ मध्ये मध्ये राज‎ ठाकरे (Raj Thackeray) यांना एका प्रकरणात मुंबईत‎ अटक करण्यात आल्यांनतर या‎ अटकेचे पडसाद परळीतही उमटले‎ होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎

Raj Thackeray
Girish Mahajan News : महाजन पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच पक्ष प्रवेशाची चर्चा; अशी काय जादू आहे त्यांच्याकडे...

पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल‎ केल्यानंतर राज ठाकरे परळीच्या‎ न्यायालयात तारखेला गैरहजर‎ राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध‎ अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.‎ या पूर्वी ३ आणि १२ जानेवारीला राज ठाकरेंना परळी‎ न्यायालयात हजर राहण्यास‎ सांगितले होते. परंतु काही कारणामुळे ते येवू शकले नव्हते. मात्र, आज ते परळी कोर्टात हजर झाल्यानंतर त्यांचे अटक वॉरंट कोर्टाने रद्द केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com