Satyajit Tambe News
Satyajit Tambe News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Politics : थोरातांचा तुम्हाला पाठिंबा आहे का? सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं...

सरकारनामा ब्यूरो

Politics : नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचा जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवरच सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अहमदनगरमध्ये सभा घेत प्रचाराची सांगता आज केली. यानिमित्त त्यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून विविध विषयावर भाष्य केलं.

''सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी या मतदारसंघात मागील पंधरा वर्षात सर्वांशी चांगले ऋणानुबंध जपले आहेत. त्यामुळे मला प्रचार करताना चागंला फायदा झाला. तसेच सर्वांनी चांगला प्रतिसाद देखील दिला. त्यामुळे माझ्या वडीलांनी केलेले काम मी पुढे घेऊन जाणार आहे'', असं ते म्हणाले. तसेच हा मेळावा संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.

यावेळी सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) म्हणाले, ''गेले २२ वर्ष झाले मी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. या काळात विविध पदांवर काम देखील केलं आहे. या कामाच्या माध्यमातून सर्वांशी जोडलो आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे राजकारण झालं त्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही. वेळ आल्यावर सविस्तर बोलणारच आहे'', असं ते म्हणाले.

यावेळी त्यांना तुम्हाला मामांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारला असता सत्यजीत तांबे म्हणाले, ''थोरात आमचे कुटुंब प्रमुख आहेत. आम्ही एका परिवारातील आहोत'', असं म्हणत त्यांनी यावर सूचक उत्तर दिलं.

याचबरोबर भाजपच्या पाठिंब्याबात त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ''भाजपच्या अंतर्गत किंवा उघड पाठिंब्याबद्दल काही माहिती नाही. मी भाजपकडे पाठिंबा मागितलेला नाही. पण त्यांनी आतून पाठिंबा दिला की नाही हे मला माहिती नाही. पण कोणी असं न मागता पाठिंबा देतं असं वाटत नाही.

याबाबत ज्या-ज्या नेत्यांनी वक्तव्य केले त्यांनाच यासंबंधी प्रश्न विचारावे. असं काही असलं तर मलाच माध्यमांच्या माध्यमातून कळतं. पण मी कोणाला संपर्क केला नाही आणि माझ्याशी देखील कोणी संपर्क केलेला नाही. मात्र, आजही आम्ही काँग्रेसचे (Congress) एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत'', असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकाच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालानंतर या मतदार संघातून कोण बाजी मारतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT