Nashik Doctor Arrested for Seeking Bribe in Goshala Grant Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ACB News: धर्मभूमी नाशिकमध्ये लाचखोरीचा काळा चेहरा; गोशाळा अनुदानासाठी ‘माया’ मागणाऱ्या डॉक्टरला ACBच्या बेड्या

ACB arrests doctor over cattle shelter grant scam: गोशाळेला सरकारी अनुदान मंजूर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डॉक्टरला एसीबीने अटक केली. या कारवाईमुळे नाशिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Sampat Devgire

Nashik ACB Trap: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ही धर्मभूमी असल्याचा गवगवा सुरू आहे. मात्र गैरप्रकार आणि लाचखोरीतून साधुसंतही सुटलेले नाहीत.सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाल्याचे लपून राहिलेले नाही.

निवृत्तीला अवघा एक महिना शिल्लक असलेल्या डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. गो शाळेच्या अनुदानासाठी ना हरकत देण्यासाठी डॉ धर्माधिकारी यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभागातर्फे गोशाळांमध्ये देशी गायीच्या संवर्धनाला प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी देशी गाईंना सराकरकडून दीड हजार रुपये अनुदान दिले जाते. पशुसंवर्धन विभागाकडून त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. संत जनार्दन स्वामी सेवा संस्कारित संस्थेची गोशाळा आहे. गोशाळेत 70 देशी गाई आहेत. त्यासाठी शासनाने साडेतीन लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले होते.

संस्थेचे अनुदान मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क केला. मात्र डॉ धर्माधिकारी यांनी त्याला दाद दिली नाही. पाठपुरावा करून निराश झालेल्या कर्मचाऱ्यांनी डॉ धर्माधिकारी यांच्याकडे संपर्क केला.

त्यासाठी डॉ धर्माधिकारी यांनी विश्वस्थानकडे ४१ हजारांची लाच मागितली. त्याबाबत वाटाघाटी झाल्यावर डॉ. धर्माधिकारी यांनी पाच हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली. त्यानंतर विश्वस्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक स्वाती पवार आणि निरीक्षक राहुल कुमार नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. त्यात डॉ धर्माधिकारी यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

जिल्हा परिषदेने राज्य पशुसंवर्धन विभागाचे एकत्रीकरण केल्यानंतर नुकताच जिल्ह्याचा कारभार धर्माधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. चक्क गोशाळेचे अनुदान आणि धार्मिक संस्थेकडे लाच मागण्याचा प्रकार उघड झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT