ED Raid Ex Kerala CM Pinarayi Vijayan: केरळच्या राजकारणात खळबळ; माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर EDचा छापा

ED Raids former Kerala CM Pinarayi Vijayan News: मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने केरळचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि त्यांची मुलगी वीणा विजयन यांच्याशी संबंधित १० ठिकाणांवर छापेमारी केली.
ED Raid Ex Kerala CM Pinarayi Vijayan
ED Raid Ex Kerala CM Pinarayi VijayanSarkarnama
Published on
Updated on

केरळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते पिनाराई विजयन तसेच त्यांची मुलगी वीणा विजयन यांच्याशी संबंधित १० ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे.

ईडीने मार्च २०२४ मध्ये या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता थेट पिनाराई विजयन आणि त्यांच्या मुलीशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याने केरळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून आगामी काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई कथित आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद व्यवहारांशी संबंधित आहे. विशेषतः वीणा विजयन यांच्या Exalogic Solutions Private Limited (ESPL) या आयटी कंपनीच्या व्यवहारांची चौकशी केंद्रस्थानी आहे. या कंपनीवर कोची येथील स्थित Cochin Minerals and Rutile Limited (CMRL) या कंपनीकडून सेवा न देता कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे.

ED Raid Ex Kerala CM Pinarayi Vijayan
Vidhan Parishd Election: भाजपला रोखण्यासाठी ठाकूर-शिंदेंची नवी खेळी?; ठाणे-पालघरच्या राजकारणात खळबळ

काय आहे प्रकरण?

२०१७ मध्ये Exalogic Solutions आणि CMRL यांच्यात सॉफ्टवेअर व मार्केटिंग सेवा पुरवण्याबाबत करार करण्यात आला होता. मात्र तपासात संबंधित सेवा प्रत्यक्षात पुरवल्याचे पुरावे न मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. २०१८-१९ पासून पुढील तीन वर्षे कंपनीला मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आल्याचा आरोप SFIO च्या तपासात समोर आला.

ED Raid Ex Kerala CM Pinarayi Vijayan
Farmer Loan Waiver Maharashtra: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आचारसंहितेतही कर्जमाफीला निवडणूक आयोगाची मंजुरी

SFIO च्या चार्जशीटनंतर ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये

एप्रिल २०२५ मध्ये Serious Fraud Investigation Office (SFIO) ने दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे या प्रकरणाला वेग आला. आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद व्यवहारांच्या आरोपांची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने जानेवारी २०२४ मध्ये SFIO चौकशीचे आदेश दिले होते.

ED Raid Ex Kerala CM Pinarayi Vijayan
Maharashtra News: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची तब्बल 52 टक्के जास्त खरेदी : CM फडणवीसांनी सर्वाधिक खरेदी करणाऱ्या 2 जिल्ह्यांची नावंही सांगितली

या चौकशीत CMRL, Exalogic Solutions आणि केरळ राज्य औद्योगिक विकास महामंडळ (KSIDC) यांच्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे CMRL मध्ये KSIDC ची सुमारे १३.४ टक्के भागीदारी असल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील मानले जात आहे.

आयकर विभागाच्या कारवाईत उघड झाला मुद्दा

या संपूर्ण वादाची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. त्यावेळी आयकर विभागाने CMRL वर छापेमारी करून काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा उल्लेख आपल्या अहवालात केला होता. त्यानंतर हे प्रकरण हळूहळू राजकीय आणि कायदेशीर पातळीवर मोठे होत गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com