Parner 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Doctor Controversy : ‘बाबासाहेबांवर आक्षेपार्ह पोस्ट’; संतप्त भीमसैनिकांचा डॉक्टरला धडा, तोंडाला शाई फासत चपलांचा हार

Massive outrage erupts Parner after alleged objectionable social media post Dr. Babasaheb Ambedkar and Kanshiramji; protesters demand strict action under Atrocity Act : अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणीत तणाव निर्माण झाला होता. डाॅक्टराविरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना महिलांसह कार्यकर्त्यांचा संताप उसळला होता.

Pradeep Pendhare

Dr Babasaheb Ambedkar insult controversy : सोशल मीडियावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीरामजी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह आणि अपमानास्पद पोस्ट शेअर करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एका डॉक्टरविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित डॉक्टरवर तातडीने ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाळवणी येथील एका नामांकित डॉक्टरने आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीरामजी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच तालुक्यातील भीमसैनिक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटनांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.

महापुरुषांचा अवमान झाल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी आज मोठ्या संख्येने भाळवणीत एकत्र येत निषेध आंदोलन छेडले. यावेळी संबंधित डॉक्टरला (Doctor) जाब विचारण्यात आला. संतप्त आंदोलकांनी सुरवातीला डाॅक्टरला चांगलाच चोप दिला.

यानंतर आंदोलकांनी डॉक्टरच्या तोंडाला शाई फासली. तसेच त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. काही महिला कार्यकर्त्या आघाडीवर असल्याचे दिसून आले.

आंदोलनादरम्यान काही लहान मुलेही उपस्थित होती. आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेत निषेध नोंदवला. दरम्यान, डॉक्टरला शाई फासताना काही शाई बाबासाहेबांच्या प्रतिमेवर उडाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तत्काळ ती प्रतिमा बाजूला घेतल्याचेही पाहायला मिळाले.

या घटनेनंतर भाळवणी परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संबंधित डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर पारनेरमध्ये पोलिसांनी पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त वाढवला आहे. पोलिसांनी फिक्स पाईंट वाढवले आहेत. समाजकंटकांच्या हालचालींवर वरिष्ठांकडून लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीची गस्त वाढवण्याचा निर्णय पारनेर पोलिसांनी घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT