Dhule News : भाजप मंत्री जयकुमार रावल यांनी इतिहास घडविला आहे. राज्यातील पहिलीच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद संपूर्णपणे बिनविरोध झाली आहे. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजपच्या सर्व 26 जागा बिनविरोध झाल्या.
मंगळवारी (ता. १८) अर्ज छाननीच्या प्रक्रियेत विरोधकांचा नगराध्यक्षपदाचा एक अर्ज अवैध ठरल्याने भारतीय जनता पक्षाकडून या पदाच्या उमदेवार मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल या बिनविरोध निवडून आल्या होत्या. राज्यातील त्या पहिल्या बिनविरोध नगराध्यक्षा त्या ठरल्या. शिवाय त्याच दिवशी भाजपचे सात उमेदवारही बिनविरोध ठरले होते.
आज (ता. २१) उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपची सरशी झाली असून यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, घोषणा देत एकच जल्लोष केला.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेत स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध झाली आहे. हा चमत्कार मंत्री रावल यांनी करुन दाखवला आहे. भाजपने पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. त्यांच्या मातोश्री चौथ्यांदा नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.
मंत्री रावल यांनी दोंडाईचा मध्ये त्यांना टक्कर देऊ शकेल असा विरोधकच शिल्लक ठेवलेला नाही. मंत्री रावल यांचे कट्टर विरोधक असलेलं देशमुख कुटुंबही आता रावल यांना शरण गेलं आहे. माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे सख्खे बंधू माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांनी तर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे रावल व देशमुख गटामधील ५० वर्षांचा संघर्ष थांबवण्यात देखील रावल यांना मोठं यश आलं आहे. त्यानंतर आता दोंडाईचा मधील निकालाने रावल यांची भाजपमधील राजकारणातील प्रतिष्ठा व राजकीय वजन निश्चितच वाढलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.