Amol Kolhe & Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Amol Kolhe Politics: पराभव दिसू लागल्यानेच अमित शाह यांनी शरद पवारांची धास्ती घेतली

Sampat Devgire

NCP Sinner News : शिव स्वराज्य यात्रेच्या नाशिक जिल्ह्यातील समारोपाच्या सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सिन्नर येथील सभा गाजवली. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, मेहबूब शेख यांसह विविध नेते उपस्थित होते. यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, राज्यातील महायुतीच्या सरकारने सव्वा लाख कोटी रुपये कर्जासाठी पत्र दिले आहे. राज्य सरकारकडे पैसा नाही.

लाडकी बहिण आणि लोकांसाठी कर्ज काढायची वेळ या सरकारवर आली आहे. खिशात नाही दमडा, पण मला बाजीराव म्हणा, अशी अवस्था या तिन्ही पक्षांची झाली आहे. महाराष्ट्र सरकारची परिस्थिती बिघडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अटकाव करण्यासाठी सगळ्यांनी काम करावे, असा आदेश अमित शहा यांनी दिला आहे. याचा अर्थ त्यांना आपला पराभव आता दिसू लागला आहे.

शेतकऱ्यांच्या ताटात जेव्हा माती कालवली जाते, तेव्हा गुलाबी जॅकेट वाले का बर गप्प बसतात? असा चिमटा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता काढला. शेतीमालाला भाव नाही. कांद्याला जेव्हा चांगला भाव येतो, तेव्हा निर्यात बंदी होते.

सोयाबीन आयात केली जाते. त्याचे भाव पाडले जातात. दूध आयात करण्यात येते. हे सगळे भाजप सरकारचे डाव आहेत. त्यांना जागा दाखवण्यासाठी नागरिकांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्याने भाजपाला हद्दपार केले. तोच कित्ता आगमी विधानसभा निवडणुकीत गिरवण्यासाठी शरद पवार यांना पुन्हा जिल्ह्याने ताकद देणे गरजेचे आहे. येथील खासदारांना काही लाखाच्या मताधिकांनी नागरिकांनी निवडून दिले. असाच पुढील उमेदवार तुतारीसाठी निवडून द्यावा.

आगामी विधानसभा निवडणूक महतत्त्वाची आहे. त्यामुळे जसे खासदारांना विजयी करण्यासाठी सगळे लढले. तसेच तुतारीचा आमदार करण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणावा, अशी त्यांनी गळ घातली. त्यामुळे सिन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडे राहील असे संकेत त्यांनी दिले.

राज्यातील सरकार ५० खोक्यांच्या मागे धावणारे आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार लोकांनी निवडून आणले. ही तर `लोकसभेसाठी अभी झाकी है, अभी विधानसभा बाकी है` या शब्दात खासदार कोल्हे यांनी सरकारचा समाचार घेतला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT