Dr Apoorva Heere Vs Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Apurv Hiray: शिक्षण मंत्र्यांचं शिक्षण काढलं अन् डॉ. अपूर्व हिरे यांच्यावर गुन्हा दाखल; हिरे-भुसे राजकीय संघर्ष शिगेला!

Dr Apurv Hiray Vs Dada Bhuse: हिरे आणि भुसे यांच्यातील राजकीय वादाला तोंड फुटले होते. त्याची परिणीती आणखी एका गुन्ह्यात पाहायला मिळाली. महात्मा गांधी विद्यामंदिर चे विश्वस्त डॉ. अपूर्व हिरे यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Sampat Devgire

Nashik News: हिरे कुटुंबीय आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. हिरे यांच्या मागे शिक्षण विभागाचा राजकीय ससेमीरा लागला आहे. त्यात आता आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.

चार दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिरे कुटुंबीयांच्या शिक्षण संस्थेवर आर्थिक आरोप करणारी पोस्ट फेसबुक वर टाकली होती. त्यात आर्थिक घोटाळ्याचा उल्लेख केला होता. या पोस्टला अद्वय हिरे यांनी देखील तेवढ्यात सत्परतेने उत्तर देत शिक्षण मंत्र्यांचेच शिक्षण काढले होते.

यानिमित्ताने पुन्हा एकदा हिरे आणि भुसे यांच्यातील राजकीय वादाला तोंड फुटले होते. त्याची परिणीती आणखी एका गुन्ह्यात पाहायला मिळाली. महात्मा गांधी विद्यामंदिरचे विश्वस्त डॉ. अपूर्व हिरे यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

संस्थेच्या महाविद्यालयात नोकरीला लावून देण्यासाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याची तक्रार रमेश राघो पवार या प्राध्यापकाने केली आहे. संस्थेचे विश्वस्त डॉ अपूर्व हिरे यांनी २८.२५ लाख रुपये घेऊन नोकरी दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असे पवार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. माजी आमदार हिरे यांच्या सोबतच लंकेश आनंद मिस्तरी, राजेश शिंदे, विश्वस्त सुखदेव पवार आणि दीपक देविदास सोनवणे यांच्या विरोधात मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार करणारे प्राध्यापक रमेश पवार हे निवृत्त आहेत. आपल्याला संस्थेत नोकरी मिळावी यासाठी संस्थेचे विश्वस्त माजी आमदार डॉ हिरे यांनी 2016 मध्ये नाशिक येथील कार्यालयात चर्चा केली. सहा महिन्यात संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्या बदल्यात वेळोवेळी रोख तसेच आरटीजीएस मार्फत पैसे दिले, असे त्यांनी म्हटले आहे.

पैशाच्या व्यवहारासाठी लंकेश मिस्त्री याच्याशी संपर्क करण्यात सांगितले होते. मिस्त्री यांनी 15 लाखाची मागणी केली. वेळोवेळी त्यानुसार आपण पैसे दिले. मात्र नोकरी मिळाली नसल्याने फसवणूक झाल्याचा दावा त्यांनी केला.

यापूर्वीही माजी आमदार डॉ हिरे तसेच त्यांचे बंधू अद्वय हिरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहे. गेले काही वर्ष शिक्षण विभागाचा ससेमिरा या संस्थेच्या मागे लागला आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे आणि हिरे कुटुंबीयातील हा राजकीय संघर्ष आहे. त्यात शिक्षण विभाग देखील सहभागी झाल्याने मालेगावचे राजकारण चांगले तापले आहे.

माझ्याविरुद्ध राजकीय आकसामुळे गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या कथेत देवाण-घेवाण आणि आर्थिक व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नाही, हे राजकीय षडयंत्र आहे.

डॉ. अपूर्व हिरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT