Deepika Chavan, Dilip Borase & Dr Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Bharti Pawar: बागलाणमध्ये ट्विस्ट, केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे नाव आले चर्चेत?

Dr Bharati Pawar politics, Baglan's BJP workers want Bharti Pawar's candidature-भाजपच्या एका गटाचा माजी खासदार डॉ भारती पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रह

Sampat Devgire

Dr Bharti Pawar News: बागलाण (सटाणा) विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या सातत्याने चर्चेत असतो. भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे आणि त्यांचे परंपरागत विरोधक माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्यातील राजकीय स्पर्धा त्याचे कारण असते.

आता मात्र बागलांच्या परंपरागत राजकीय लढाईत एक नवा ट्विस्ट आला आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार बोरसे हे निवडणुकीचे तयारी करीत आहेत. पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणा आणि पदाधिकाऱ्यांची त्यांचा चांगला समन्वय देखील आहे.

मात्र आदिवासी मतदारांमध्ये श्री बोरसे यांच्या विषयी वाढती नाराजी आहे. जिल्ह्यात आदिवासींच्या विविध प्रश्नांवर गेली काही दिवस सातत्याने आंदोलन होत आहे. विशेषतः वन जमिनींचे आंदोलन आणि नुकत्याच झालेल्या पेसा कायद्यातील भरतीचा रखडलेला प्रश्न त्यात प्रामुख्याने आहे.

या आंदोलनात आदिवासी आमदार असूनही आमदार बोरसे त्यापासून अलिप्त राहिले. आदिवासी समाजाच्या विविध संघटना सध्या भाजपच्या विद्यमान लोकप्रतिनिधींवर नाराज आहेत. यातूनच भाजपच्या एका गटाने माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना उमेदवारी मिळावी, अशी चर्चा सुरू केली आहे.

पर्यायी उमेदवार म्हणून त्या प्रभावी ठरू शकतात. त्याची विविध कारणे देखील आहेत. या मतदारसंघात कळवण तालुक्यातील ३८ गावांचा समावेश आहे. या गावांवर (कै) माजी मंत्री ए. टी. पवार यांचा प्रभाव आहे. ए. टी. पवार यांनी या भागाच्या विकासासाठी अनेक कामे केली होती.

आदिवासी मतदारांमध्ये ए. टी. पवार यांच्याविषयी चांगली भावना असल्याचे बोलले जाते. यातूनच आता भारतीय जनता पक्षातच येत्या निवडणुकीत उमेदवार कोण? यावरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मतदारसंघात आमदार बोरसे आणि त्यांचे परंपरागत विरोधक माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात.

माजी आमदार चव्हाण मतदार संघातील प्रश्न आणि सत्ताधारी पक्षाविरोधात राजकीय भूमिका घेत असल्याने चर्चेत असतात. गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहे. त्यामुळे बागलांमध्ये आमदार बोरसे आणि माजी आमदार चव्हाण हे परंपरागत विरोधक एकमेकांना अडचणीत आणण्याची कुठलीही संधी सोडत नाही.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांना या मतदारसंघातून आघाडी मिळाली होती. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही आघाडी कमी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आगामी लढतीत उच्चशिक्षित आणि पक्षात सक्रिय असलेल्या भाजप नेत्या डॉ पवार यांना संधी मिळणार का? याचीच सध्या चर्चा आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT