Eknath khadse : भाजप प्रवेशासाठी वेटिंगवर असलेले एकनाथ खडसे म्हणतात, 'मविआचे सरकार यावं...'

Eknath khadse MVA BJP : सुडभावनेने ईडीची कारवाई केली जाते. फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. माझी लाडकी बहीण ही योजनेवर निवडणुका बघून खर्च केला जातो आहे, असा टोला देखील खडसे यांनी लगावला.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Eknath khadse News : भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी जाहीर केले. मात्र, अजुनही खडसे यांचा पक्ष प्रवेश झालेला नाही. खडेस यांनी इशारा देत जर प्रवेशासाठी काही दिवस वाट पाहू नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात पु्न्हा सक्रीय होऊ, असा इशारा दिला. मात्र, अजुनही त्यांची दखल भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतली नाही.

भाजप प्रवेशासाठी वेटींगवर असलेल्या खडसेंनी आता 'महाविकास आघाडीचे सरकार यावे, असं मला वाटते, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सुडभावनेने ईडीची कारवाई केली जाते. फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. माझी लाडकी बहीण ही योजनेवर निवडणुका बघून खर्च केला जातो आहे, असा टोला देखील खडसे यांनी लगावला.

46 हजार कोटीची लाडकी बहीण योजना आणता. काही पैसे धरणाला द्या, शेतकऱ्यांना द्या, असे देखील खडसे म्हणाले.

Eknath Khadse
Sharad Pawar : 'वस्तादा'च्या डावाच्या केवळ चर्चेनेच आणखी एका बड्या नेत्याला फुटला घाम

निवडणुका बघून हा खर्च केला जातो आहे. जनतेला माहीत आहे की हे निवडणुकीसाठी सुरू आहे. हाच पैसा धरणासाठी, रस्त्यासाठी दिला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. रोजगार मिळाला असता. आत्महत्या थांबल्यास असत्या, असे देखील खडसे म्हणाले.

भाजप प्रवेशावर महाजन काय म्हणाले?

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, खडसे हे दिल्लीला गेले होते. दिल्लीत त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांचा प्रचार केल्याचा दावा केला. खडसे यांना पक्षाच्या अध्यक्षांनीच प्रवेश दिला असेल, तर त्याला विरोध करण्याची हिम्मत कोणी करू शकेल का? निदान माझी तरी तेवढी हिंमत नाही. खडसे हे सतत रडीचा डाव खेळत असतात. बहाणेबाजी करतात.

Eknath Khadse
Vijay Wadettiwar : 100 फुटाच्या रॅम्पवर मुख्यमंत्री, दोघं उपमुख्यमंत्री 'रॅम्प वॉक' करतात, फॅशन-शो आहे काय? विजय वडेट्टीवारांचा संताप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com