Dr Bharati Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Bharati Pawar : सरकारच्या 'त्या' निर्णयाने भारती पवारांच्या अडचणी वाढणार

Dindori Constituency 2024 : सरकारच्या 'त्या' निर्णयाने भारती पवारांच्या अडचणी वाढणार निर्णय केंद्र शासनाने घेतल्याचा निवडणुकीवर होणार परिणाम. त्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत.

Sampat Devgire

Dr Bharti Pawar News : केंद्र शासनाने गुजरातहून दोन हजार किलो कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कांदा निर्यातबंदी आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांतील कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. यंदाच्या निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अस्वस्थ आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने डिसेंबर महिन्यात कांदा निर्यातबंदी केली. त्याचा नकारात्मक परिणाम नाशिकच्या कांदा उत्पादकांवर झाला आहे. कांद्याचे दर 40 रुपयांवरून थेट 10 रुपयांवर आले. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. या प्रश्नावर भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार अडचणीत आलेल्या आहेत.

कांदा उत्पादक शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाने त्रस्त आहेत. दिंडोरी मतदारसंघातील प्रत्येक गावात या प्रश्नावर असंतोष आहे. त्याचा मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर झालेला आहे. भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार Bharati Pawar यांना या असंतोषाचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना कशी मदत झाली हे मांडण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यातबंदीचा प्रश्न प्रमुख मुद्दा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत भाजप उदासीन असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या हंगामात केंद्र शासनाने गुजरातहून पांढरा कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय म्हणजे दिंडोरी आणि धुळे मतदारसंघातील Dhule Constituency शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्याच्या अपेक्षित प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त झाल्या. त्यामुळे भाजपच्या डॉ. पवार यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. भारतीय जनता पक्षाला विरोधकांकडून कांदा निर्यातीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीचा Loksabha Election प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा प्रमुख मुद्दा विरोधकांच्या रडारवर आहे. त्याला बळ देण्याचा प्रकार केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयातून झाला आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या प्रश्नावर भाजप तसेच त्यांच्या उमेदवारांना घेरण्याची आयतीच संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. धुळे आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना या निर्णयाने मोठ्या राजकीय अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT