Piyush Goyal & Bharti Pawar
Piyush Goyal & Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News; डॉ. भारती पवार स्वतः म्हणाल्या कांदा उत्पादक अडचणीत!

Sampat Devgire

नाशिक : कांद्याचे भाव कोसळल्याने त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर (Farmers) होत आहे. त्याची दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी घेतली आहे. नाफेड (NAFED) मार्फत योग्य त्या किमतीत कांदा खरेदी सुरू करावी याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री (Centre) पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मागणी केली आहे. (Onion growers are in trouble due to fall down price)

आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. लासलगाव व पिंपळगाव या मोठ्या बाजार समित्या देखील आहेत. गेले काही दिवस सातत्याने कांदा दर कोसळत आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सद्यःस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमत विचारात घेता नाफेड मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी यासाठी डॉ. पवार यांनी पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले. राज्य सरकार मार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ नाफेड मार्फत योग्य त्या किमतीत कांदा खरेदी सुरू करावी अशा आशयाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील निवेदद्वारे कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे. याचा परिणाम भावावर होत असून दर घसरले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून कांदा पीक कमी किमतीत विक्री करावे लागत असल्याने, अशा करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन नाफेड मार्फत तत्काळ कांदा खरेदी करण्याबाबत डॉ. पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT