Trible News; विजयकुमार गावित धावले विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या मदतीला

डॉ. विजयकुमार गावित यांच्या पुढाकाराने अकृषी विद्यापीठांमध्ये वसतिगृह उभारणीबाबत मंत्रालयात बैठक
Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar GavitSarkarnama

नंदुरबार : (Nandurbar) विद्यापीठाच्या परिसरातच वसतिगृह उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना (Education) शैक्षणिक परिसर सोडून लांब राहावे लागणार नाही. विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह असेल. त्यासाठी लागाणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आदिवासी (Trible) विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिली. (Now hostel will be build in university premises)

Dr. Vijaykumar Gavit
Nashik News; नाशिकच्या ‘या‘ प्रकल्पाला आज दिल्लीची मंजुरी?

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली.

Dr. Vijaykumar Gavit
Breaking News; शिवसेना महानगरप्रमुख बडगुजर यांना एक वर्ष कारावास!

मुंबईत झालेल्या या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

यासंदर्भात डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्न करीत असतो. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात जातात. तिथे त्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होईल.

वसतिगृहाच्या कामाला गती द्या

राज्यातील विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहांच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील म्हणाले, की विद्यापीठाच्या परिसरात आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी कमीत कमी ५०० क्षमतेचे व जास्तीत जास्त हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरची क्षमता लक्षात घेऊन त्या त्या विद्यापीठांनी तातडीने प्रस्ताव तयार करून आदिवासी विकास विभागाकडे पाठवावा, असे निर्देश संबंधितांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com