Dr. Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nanded Death cases : भारती पवार, दादा भुसे पोहोचले थेट जिल्हा रुग्णालयात!

Dr. Bharti Pawar and Dada Bhuse take review of Medical facilities and treatment in Civil : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, नांदेडमधील ‘त्या’ रुग्णांचा मृत्यू औषधांअभावी झालेला नाही.

Sampat Devgire

Nanded Death cases : नांदेड जिल्हा रुग्णालयातील मृत्यूच्या घटनांनतर तेथील डॉक्टर जागरूक झाले की नाही, याची माहिती नाही. मात्र, मंत्री जागरूक झाले आहेत. काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले. वैद्यकीय सुविधांची माहिती घेत डॉक्टरांशी चर्चा केली. (Ministers warns staff for Nashik civil Hospital on after Nanded Case)

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार Dr. Bharati Pawar यांनी पालकमंत्री दादा भुसे Dada Bhuse यांसह जिल्हा रुग्णालयातील Nashik सुविधांचा आढावा घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तीन दिवसांत ३७ रुग्णांचा मृत्यू औषधांअभावी झालेला नाही. तसा अहवाल केंद्रीय आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली.

दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनीही जिल्हा रुग्णालयाची पाहणी करीत दक्षता बाळगण्याबाबतच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. नांदेड येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करीत उपलब्ध औषधसाठ्याची माहिती घेतली.

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसह औषधसाठा व कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नांदेड येथील घटना दुर्दैवी असल्याचे सांगत नवजात बालके व्हेंटिलेटरवर असतानाच त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले होते.

तेथील घटनेचा समितीमार्फत अहवाल प्राप्त होणार आहे. प्राथमिक अहवालानुसार रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे वय जास्त होते, तर अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ अवस्थेत या रुग्णालयात दाखल झाले होते. औषधे नसतील तर मागणी केल्यास केंद्राकडून औषधे उपलब्ध करून दिली जातात, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या खाटा वाढविण्याची गरज आहे. अतिदक्षता विभागाच्या खाटा ८० करण्यात येतील, डॉ. पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT