Dr Bharti Pawar, Minister of state, GOI
Dr Bharti Pawar, Minister of state, GOI Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, आमचे द्राक्ष शेतकरी, जगात भारी!

Sampat Devgire

पिंपळगाव बसवंत : नाशिकचे द्राक्ष उत्पादक शेतकरी अनेक वर्षे अफाट परिश्रम व कल्पना लढवून जगाला द्राक्ष खाऊ घालत आहे. त्यांनी जगाची बाजारपेठ काबीज करावी यासाठी जगाच्या स्पर्धेत टिकेल असे द्राक्षाचे वाण आयात करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Centre health minister of state Dr Bharti Pawar) यांनी केले.

द्राक्ष बागाईतदार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार पिंपळगावच्या बसवंत प्रतिष्ठान व फ्राटेली फ्रुटस फार्मरतर्फे आज झाला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाचे संचालक माणिकराव पाटील, द्राक्षबागाईतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास भोसले प्रमुख उपस्थित होते.

डॅा भारती पवार म्हणाल्या, परदेशी बाजारपेठत स्पर्धेक देशांना टक्कर देण्यासाठी नवीन द्राक्ष वाणांची लागवड करणे ही काळाची गरज आहे. रंग व चवीला परिपूर्ण असलेले वाण परदेशातून आयात करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करणार आहे. किसान रेल उपक्रमाचा सर्वाधिक लाभ नाशिकच्या शेतकऱ्यांना झाला आहे. द्राक्ष, कांद्यासह भाजीपाला मोठ्या प्रमाणात देशभर पोहचत आहे. द्राक्षउत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असेल.

त्या पुढे म्हणाल्या, दिल्लीत नाशिकची ओळख करून देतांना मी द्राक्षांची पंढरी असा आवर्जुन उल्लेख करते. परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्षांला गत दोनवर्षापासून कोरोनाचा फटका बसला. लॉडऊनच्या काळात केंद्र शासन द्राक्षउत्पादकांच्या पाठिशी उभे राहिले, त्यामुळे देशांत बहुतांश राज्यात नाशिकची द्राक्ष पोहचली. पश्‍चिम बंगाल राज्य सरकारने मात्र द्राक्ष मालाची अडवणूक केली, त्यामुळे बांग्लादेशमध्ये द्राक्ष पोहचविण्यासाठी मंत्री पियुष गोयल यांनी विशेष रेल्वे उपलब्ध करून दिली. द्राक्ष निर्यातीच्या अनुदान मिळवून देण्यासह द्राक्ष उत्पादकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी लवकरच कृषी, वाणिज्य विभागाचे मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फलोत्पादन बोर्डाचे संचालक माणिकराव पाटील म्हणाले, हवामानानुसार द्राक्षशेतीत स्थित्यंतर येणे गरजेचे आहे. नवीन वाण परदेशातून आणण्यासाठीचे नियम केंद्र शासनाने शिथिल करावेत, त्यासाठी मंत्री डॉ.पवार यांनी पुढाकार घ्यावा.

द्राक्षबागाईतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी द्राक्षशेती अस्मानी व सुलतानी संकटात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पदाचा वापर करणार आहे.

बसवंत प्रतिष्ठानेचे सतीश मोरे, बापूसाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा काम करतांना उत्साह वाढावा म्हणून सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले. पिंपळगावच्या स्वंयवर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास राजेद्र मोगल, यतीन कदम, ॲड. रवींद्र निमसे, सुरेश डोखळे, सुरेश कळमकर, विलास शिंदे, अन्नू मोरे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT