Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam Gorhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Neelam Gorhe: आदिवासी मुलांच्या विक्रीची नीलम गोर्‍हेकडून दखल

Sampat Devgire

नाशिक : येथील आदिवासी (Trible) पालकांनी आर्थिक अगतीकतेतून मुलांची (sold childs due to financial crisis) विक्री केल्याचा दुर्दैवी प्रकार चर्चेत आहे. त्याची माहिती मिळताच, विधान परिषदेच्या सभापती (Maharashtra legislative Council) डॉ. नीलम गोर्‍हे (Dr. Neelam Gorhe) यांनी त्याची दखल घेतली. याबाबत त्यांनी सरकारला पत्र लिहून कार्यवाहीचे निर्देश दिले. (Trible family sold there childrens in Nashikn District)

आदिवासी भागातील नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्यावर अशी वेळ का आली याबाबत सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आज विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आज दिले. त्यांच्या कार्यालयातून आज याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडून माहिती घेण्यात आली.

नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाधरन आणि पोलिस अधीक्षक श्री. संदीप पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. नाशिक आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल हिरामणी आणि अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याशी देखील याबाबत चर्चा करण्यात आली. याविषयी पोलिस यंत्रणेकडून योग्य तो अहवाल सादर करण्यात येईल असे पोलिस अधिक्षक यांनी कळविले आहे.

नासिक आणि अहमदनगर भागातील आदिवासी पालकांनी आपल्या पोटाच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विकल्याची धक्कादायक बातमी नुकतीच काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची त्वरीत दखल घेऊन डॉ. नीलम गोर्‍हे यांनी यांची दखल घेतली.

अशा प्रकारच्या घटना घडवून आणणारे कोणी समाजकंटक नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत की काय याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा प्रकारच्या घटना आदिवासी भागात पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी आदिवासी कुटुंबांना शाश्वत स्वरूपाचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी गांभीर्याने प्रयत्न आदिवासी विकास विभागाने करावा अशी सूचना यावेळी त्यांनी केली आहे.

राज्य सरकारने नुकतेच नीती आयोगाच्या धर्तीवर राज्य सल्लागार समितिची स्थापना करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण कृषि, आरोग्य आणि रोजगार विषयक काम करण्यात येणार असून त्याचा आढावा मुख्यमंत्री स्तरावरून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यभरातील आदिवासी कुटुंबांचा या पार्श्वभूमीवर रोजगार, शिक्षण, कृषि विकास आदि मुद्द्यांवर प्राधान्याने विचार करण्याची सूचना डॉ. गोर्‍हे यांनी केली आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT