Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister Jayakumar Rawal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अचानक बायबाय ; दोन दिवसांपूर्वीचे 'पक्ष निरीक्षक' आज भाजपच्या गोटात

Dr. Ravindra Deshmukh Join BJP : भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मोठी राजकीय खेळी खेळली आहे. त्यांच्या या खेळीमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे.

Ganesh Sonawane

Dhule Politics : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघातील भाजपचे आमदार व मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा(ता.शिंदखेडा) नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोठा डाव टाकला. माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे सख्खे बंधू माजी नगराध्यक्ष डॉ. रवीद्र देशमुख यांना गळाला लावत त्यांचा काल भाजपत प्रवेश घडवून आणला.

या प्रवेशामुळे शिंदखेडा तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. गेल्या पाच दशकांपासूनचे रावल गट आणि देशमुख गटाचे राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. मात्र, डॉ. रवींद्र देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने या दोन्ही गटांतील 50 वर्षांपासूनचा संघर्ष आता थांबला आहे.

माजी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख हे आता राजकारणात सक्रीय नाहीत. त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला आहे. पंरतु आजही ते राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध ठेऊन आहेत. मात्र, त्यांचे बंधू डॉ. रवींद्र देशमुख आणि जावई अमित पाटील यांनी आपल्या समर्थक माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या ताफ्यात आता रवींद्र देशमुखांची एण्ट्री झाली आहे.

धक्कादायक व विचार करण्यासारखी गोष्ट तर ही आहे की, दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉ. रवींद्र देशमुख यांची पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक केली. खास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन देशमुख यांच्यावर दोंडाई शहराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण दोनच दिवसात त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली.

या पक्षप्रवेशाचा परिणाम असा झाला की, मंत्री रावल यांना आता तेवढ्या ताकदीचा विरोधकच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे रावल यांची गढी असलेले दोंडाईचा शहर रावल यांच्यासाठी अधिकच सुरक्षित झाले आहे. यामुळे दोंडाईचा येथे सत्ता स्थापन करण्याचा रावल यांचा मार्ग अधिक सोपा झाल्याचे बोलले जाते.

यांचाही झाला भाजप प्रवेश

देशमुख गट समर्थक माजी उपनगराध्यक्ष दिनेश चोळके, माजी सभापती महेंद्र पाटील, भूपेंद्र धनगर, ॲड. रवींद्र मोरे, कैलास वाडिले, गिरधारी रामराख्या, अबिद शेख, मोसीम शेख, मनोज महाजन, राहुल आव्हाड, देवेंद्र चौधरी, दीपक कोल्हाटी, जितेंद्र तिरमली, संजय नगराळे, अशोक सोनवणे, अंजन विहिरेचे माजी सरपंच सुधाकर पाटील, जोगशेलूचे सरपंच नितीन देसले, सुमित गरुड, कालू नगराळे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT