Nashik Politics : राहुल आहेरांचा मास्टरस्ट्रोक, शिरीष कोतवालांना भाजपत घेत बंधू केदा आहेर व कुंभार्डेंसाठी दरवाजे बंद !

Rahul Aher Strategy Shirish Kotwal BJP Entry : भाजप आमदार राहुल आहेर यांना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शिरीष कोतवालांना भाजपत प्रवेश देत बंधू केदा आहेर व आत्माराम कुंभार्डे यांची मोठी कोंडी केली आहे.
Shirish Kotwal BJP Entry
Shirish Kotwal BJP Entrysarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : भाजपने नाशिकमध्ये कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनाच आपल्या गळाला लावलं आहे. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी भाजपचे संकटमोचक व जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत काल भाजपमध्ये प्रवेश केला. कोतवाल यांच्या भाजप प्रवेशात स्वत : आमदार राहुल आहेर यांनी महत्वाची भूमिका बजावली.

कोतवाल यांचा भाजपत प्रवेश घडवून आणत राहुल आहेर यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. यामाध्यमातून जिल्हापरिषदेचे माजी सदस्य आत्माराम कुंभार्डे व बंधू केदा आहेर यांचा राजकीय गेमच आमदार राहुल आहेर यांनी केला आहे. कुंभार्डे व केदा आहेर दोघेही भाजपत येण्यासाठी प्रयत्नशील होते. भाजप प्रवेशासाठी त्यांच्या हालचाली सुरु होत्या.

परंतु कुंभार्डे व बंधू केदा आहेर यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी राहुल आहेर यांनी कॉंग्रेसचा जिल्ह्यातील प्रमुख नेता असलेल्या कोतवाल यांच्याशी सलगी करत त्यांना भाजपत येण्याचे निमंत्रण दिले. कोतवाल यांना भाजपत प्रवेश देऊन राहुल आहेर यांनी कुंभार्डे व केदा आहेर दोघांसाठी भाजपचे दरवाजे बंद केले आहेत.

Shirish Kotwal BJP Entry
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातले निवडणूक प्रभारी ठरवले ; दमदार खांद्यांवर टाकला भार

विधानसभेला केदा आहेर भाजपकडून इच्छुक होते. पंरतु भाजप वरिष्ठांनी राहुल आहेर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या केदा आहेर यांनी बंधू राहुल आहेर यांच्याविरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. दोघांनाही कॉंग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांचे आव्हान होते. पंरतु या निवडणुकीत राहुल आहेर यांचा विजय झाला. परंतु या निवडणुकीमुळे आहेर बंधूंचे संबंध बिघडले. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले.

तर आत्माराम कुंभार्डे हे जिल्हापरिषदेत भाजपचे गटनेते होते. त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन केदा आहेर यांना निवडणुकीत मदत केली होती. राहुल आहेर यांच्याविरोधात कुंभार्डे व केदा आहेर यांनी प्रचारादरम्यान पातळी सोडून वक्तवे केली होती. त्याचाच राग राहुल आहेर यांना आहे.

Shirish Kotwal BJP Entry
Chhagan Bhujbal : भुजबळांना पुन्हा वगळलं..लोकसभा, विधानसभेनंतर स्थानिकच्या निवडणुकीतही प्रचारापासून दूर ठेवणार

कुंभार्डे यांचे यंदा त्यांच्या पारंपारिक जिल्हापरिषदेच्या गटातील मतदार यादीत नाव नाही. त्यामुळे ते नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यपदावर निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी ते भाजपमध्ये येण्याचे प्रयत्न करत होते. त्याचाच भाग म्हणून पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी राहुल आहेर यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतल्याचे समजते. परंतु राहुल आहेर यांनी थेट शिरीषकुमार कोतवाल यांना भाजपत घेत कुंभार्डे व बंधू केदा आहेर यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद केले आहेत.

तसेच कोतवाल यांच्या भाजप प्रवेशावेळी आता बस झाले.. भाजपत आणखी प्रवेश नको.. असे सूचक वक्तव्य करत मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com