Dr. Shobha Bachhav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Shobha Bachhav Politics : खासदार बच्छाव म्हणतात, सोनिया गांधी यांच्या शब्दाखातर केली उमेदवारी!

Sampat Devgire

Dr Shobha Bacchav News : मी लोकसभेची उमेदवारी करीन असे कधीही वाटले नव्हते. केवळ काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या शब्दाखातर मी उमेदवारी केली, असे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव म्हणाल्या आहेत.

धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या डॉ बच्छाव निसटत्या आघाडीने विजयी झाल्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे दोन टर्म खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या डॉ सुभाष भामरे यांचा धक्कादायक पराभव केला.

या संदर्भात डॉ बच्छाव म्हणाल्या, माझी इच्छा नसताना पक्षाने निष्ठावंतांना प्राधान्य देण्याचे ठरवल्यामुळे मला उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर ४५ दिवसात मतदार संघाचा कानाकोपरा पिंजून काढत प्रचार केला. माझ्यावर पक्षातीलच काही लोकांनी असबद्ध आरोप केले. प्रचारात अडकाठी आणली.

मी धीराने व संयमाने सगळ्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. मतदार संघातील प्रत्येक गावाला भेट देण्याचा माझा प्रयत्न होता. त्यातून पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केले.

विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या (NCP) नेत्यांचे खूप सहकार्य होते. त्यामुळे माझे निवडणूक उभी राहिली. ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने अनेक गैरप्रकार आणि अपप्रचार करूनही मतदारांनी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला.

आगामी काळात या मतदारसंघातील नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यावर माझा भर असेल. पिण्याचे आणि सिंचनासाठी पाणी रस्ते मालेगाव शहरातील प्राथमिक सुविधा आदीना माझे प्राधान्य असेल. त्याचा बारीक अभ्यास मी करीत आहे.

गेली अनेक वर्ष या मतदारसंघात पाण्याची समस्या बिकट आहे. वीज, शिक्षण, आरोग्य, रस्ते हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. धुळे इंदूर रेल्वे मार्ग, सुरवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना आणि माजी खासदारांच्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी मी परिश्रम घेईन. त्या पूर्ण करेन असा दावा खासदार डॉ बच्छाव यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT