Vivek Kolhe Vs Kishore Darade : विवेक कोल्हेंचा आमदार दराडेंना सज्जड दम; 'बाप दाखवा नाहीतर...'

Nashik Teacher Vidhan Parishad Constituency Election : नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आमदार किशोर दराडे यांना पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे. आमदार दराडेंनी केलेले आरोप सिद्ध करावे, असे आव्हान विवेक कोल्हे यांनी दिले आहे.
Vivek Kolhe Vs Kishore Darade
Vivek Kolhe Vs Kishore Daradesarkarnama

Vivek Kolhe News : आमदार किशोर दराडे यांना विवेक कोल्हे यांना त्यांच्या होम ग्राऊंडवर घेरणं महागात पडू शकतं. 117 एकर सरकारी जमीन लाटण्याचा आणि नोकरीसाठी 15 लाख रुपयांचे अमिष केल्याचा आरोप केला होता. विवेक कोल्हेंनी यावर आमदार किशोर दराडे यांना सज्जड दम देत आरोपांची कायदेशीर चाचपणी सुरू असल्याचे सांगितले.

'बाप दाखवा नाहीतर...', या म्हणीची आठवण करून देत आरोप सिद्ध करा. नाहीतर, कायदेशीरमार्गाने अब्रुनुकसानीचा दावा ठोकू', असा इशारा विवेक कोल्हेंनी आमदार दराडेंना दिला आहे. 'शिष्यवृत्तीत केलेल्या घोटाळ्याचे पुरावेच सरकारसमोर मांडतो', असेही विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.

नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीला नगरमधील युवा नेते विवेक कोल्हे अपक्ष म्हणून समोरे जात आहे. विवेक कोल्हे यांची काल नगरमध्ये पत्रकार परिषद झाली. महायुतीतील शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांनी चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन साखर सम्राटांनी येवलेला साखर कारखाना होऊ दिला नाही.

कोपरगावपासून 18 किलोमीटरवर असलेल्या येवला येथे कारखाना झाला असता तर, त्यांचा कारखाना बंद पडला असता. येवलेकरांना त्यांनी नेहमाच त्रास देण्याचे काम केले. आरोप करणाऱ्यांनी सरकारकडून 117 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तसेच डमी उमेदवार कोपरगावचा असून, विरोधकांनी त्याला 15 लाख रुपये आणि नोकरीचे अमिष दाखवून उमेदवारीचा अर्ज भरण्यास लावल्याला आरोप केला होता.

Vivek Kolhe Vs Kishore Darade
Nilesh Lanke and Balasaheb Thorat : नीलेश लंके यांचे बाळासाहेब थोरातांबाबत मोठं भाकीत; 'सरकार येणार अन् थोरात...'

नाशिक (Nashik) शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी या आरोपावरून आमदार किशोर दराडे यांना पुरतं घेरलं आहे. एकप्रकारे सज्जड इशारा दिला आहे. केलेल्या आरोपांची कायदेशीर चाचपणी सुरू आहे. आपल्याकडं एक म्हण आहे, 'बाप दाखव नाहीतर...' यानुसार त्यांनी आरोप सिद्ध करावेत. नाहीतर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा देत विवेक कोल्हे यांनी आमदारांच्या संस्थेतील उद्योगांवर भाष्य केले.

त्यांच्या संस्थेत 19 वर्षाचा, 75 वर्षांचा आणि नववी पास झालेला शिक्षक देखील मतदार यादीत आढळतो. शेतात काम करणारा शेत मजूर देखील त्यांच्या संस्थेत दाखवला गेला आहे. कापड दुकानातील कर्मचारी देखील यांच्या संस्थेत आहे. हा प्रकार दुर्दैवी असून, शिक्षकांच्या अधिकारांवर घाला घातला जात आहे. हाच सर्व प्रकार रोखण्यासाठी शिक्षकांच्या आग्रहानुसार अपक्ष म्हणून निवडणुकीत उभा राहिल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले.

Vivek Kolhe Vs Kishore Darade
Ahmednagar Politics : नगर लोकसभा गमावलेला भाजप आता मोठी चाल खेळणार; थेट अजितदादांच्या नेत्याला मंत्री करणार?

नाशिक शिक्षक विधान परिषदेत चॅलेंज देणारा मतदारसंघ आहे. युवकांनी चॅलेंज स्वीकारायचे नाहीतर, कोणी? असा प्रतिप्रश्न करून शिक्षकांच्या पाठिंब्यानुसार हे चॅलेंज स्वीकारले आहे. 'टीडीएफ' ही शिक्षकांची मोठी संघटना आहे. विधान परिषदेच्या मतदारसंघात तालुकानिहाय संघटनेचा पाठिंबा मिळत आहे. यातूनच समोरचे सत्ताधारी काहीचे सैरभैर झाले आहेत.

माझ्या संस्थेवर सरकारने छापे घातले. त्यांनी त्यांचे काम केले. त्यावर मी भाष्य करणार नाही. परंतु संबंधित आमदारांच्या संस्थेमध्ये शिष्यवृत्तीचा घोटाळा घेऊन आपल्यासमोर लवकर येतो. पुराव्यानिशी येतो. त्यावेळी सरकारने तेवढ्यात तत्परतेने कारवाई करावी, असेही विवेक कोल्हे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com