Chhagan Bhujbal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation Issue : ‘भुजबळ मराठा समाजाचा मोगलांपेक्षाही जास्त द्वेष करतात’

Dr. Sujeet Gunjal Says, Chhagan Bhujbal Hates Maratha Community More Than Mughals - येवला मतदारसंघातील विंचूरच्या ४६ गावांतून हजारो समाज बांधव अंतरवाली सराटीच्या सभेला जाण्याची तयारी करीत आहेत.

Sampat Devgire

Maratha reservation News : ‘मोगलांनीदेखील केला नसेल तेवढा द्वेष छगन भुजबळ मराठा समाजाचा करीत आहेत. हे योग्य नाही. त्यांनी आपली भूमिका बदलावी; अन्यथा त्यांना परत पाठविण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे,’ असा इशारा येवला मतदारसंघातील सकल मराठा समाजाचे नेते डॉ. सुजित गुंजाळ यांनी दिला आहे.

अंतरवाली (जालना) (Jalna) येथे शनिवारी होणाऱ्या सभेसाठी विंचूर (Yeola) परिसरातील ४६ गावांतून हजारो मराठा (Maratha) समाजाचे कार्यकर्ते जाणार आहेत. याबाबत डॉ. पाटील विविध सभांमध्ये बोलत होते.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ प्रतिनिधित्व करीत असलेल्या येवला मतदारसंघातील विंचूर परिसरातील ४६ गावांमध्ये अंतरवाली सराटी येथे शनिवारी मराठा आरक्षणाबाबत होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गावोगावी सभा घेतल्या जात आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या सभेला जातील, असा विश्वास या भागातील सकल मराठा समाजाचे नेते डॉ. गुंजाळ यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, भुजबळ हे खूप मोठे नेते आहेत. त्यांनी देशभर तसे दौरे करावेत. मात्र, ते स्वतःला केवळ ओबीसी नेते समजतात. गरीब मराठा समाजाच्या मार्गात अडथळे आणतात. त्यांना मराठा समाजानेदेखील मतदान केलेले आहे, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. मतदारसंघात येताना त्यांनी सगळ्यांचे नेते म्हणून आले पाहिजे. मात्र, तसे होत नाही, याचा खेद वाटतो.

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटी (जालना) येथील एल्गार मेळाव्यासाठी येवला-लासलगाव मतदारसंघातील ४६ गावांतील कार्यकर्ते व समाज बांधव लासलगाव येथे जमतील. तेथून मोठ्या संख्येने ते रवाना होतील, असे डॉ. गुंजाळ म्हणाले.

यासंदर्भात माजी आमदार कल्याणराव पाटील, जयदत्त होळकर, डॉ. श्रीकांत आवारे, डॉ. गुंजाळ, ललित दरेकर, शिवा सुराशे, शंकरराव दरेकर, मुस्लिमांसह इतर समाज बांधवदेखील मदत करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT