Bhagyashree Patil
Bhagyashree PatilSarkarnama

Drug Mafia Lalit Patil : पाटीलच्या आईला भीती, ‘राजकारणी माझ्या मुलाचा एन्काउंटर करतील’

Drug Mafia Lalit Patil`s mother fear that police may encounter my son-फरार ड्रगमाफिया ललित पाटीलच्या आईने पोलिसांकडून आपल्या मुलाचा एन्काउंटर होणार असल्याचे सांगितले.
Published on

Nashik Police News : ड्रगमाफिया ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. या प्रकरणाला मिळालेले राजकीय वळण तसेच या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, त्याची सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे. (Drug mafia Lalti Patil at present Absconded from police custody)

नाशिक (Nashik) येथील एका कारखान्यात तीनशे कोटींचे ‘एमडी’ ड्रग्ज सापडले होते. याबाबत मुंबई, (Mumbai) पुणे (Pune) तसेच नाशिक अशा तीन शहरांतील पोलिसांसह (Police) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर विविध आरोप होत आहेत.

Bhagyashree Patil
Sanjay Raut News : ‘छगन भुजबळांना माहितीच नाही, ते धादांत खोटे बोलत आहेत’

राजकीय वळण मिळाल्याने सत्ताधारी मंत्री तसेच विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून एकमेंकावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप थेट पोलिस यंत्रणा तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीदेखील विविध प्रश्न निर्माण करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर ललित पाटील याची आई भाग्यश्री पाटील हिने आज पोलिसांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. अत्यंत हाय प्रोफाइल बनलेल्या या प्रकरणाविषयी त्या म्हणाल्या, ‘ललित पाटीलला असेल तेथे पकडावे. आमचे सर्व सहकार्य राहील. मात्र, त्याचा एन्काउंटर करू नये.’

त्या म्हणाल्या, ‘काल साध्या वेशातील एक पोलिस कर्मचारी आमच्या घरी आला होता. त्याने ललित पाटीलला पोलिस शोधत आहेत. त्याचा एन्काउंटर करणार असल्याची माहिती त्या कर्मचाऱ्याने मला दिली.’

‘सध्या या प्रकरणात राजकारण होत आहे. त्यात काही लोकांचे राजकारण असून, या मंडळीकडून माझ्या मुलाचा एन्काउंटर होण्याची भीती मला वाटते. त्यांनी तसे करू नये, अशी माझी हात जोडून विनंती आहे.’ आपल्या निवासस्थानी त्यांनी काही पत्रकारांशी बोलताना अगतिक होत, हे विधान केले.

Bhagyashree Patil
Sharad Pawar News : शाळेत गौतमी पाटीलचं नृत्य; पवारांनी 'महायुती'च्या 'कंत्राटी' धोरणाची केली चिरफाड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com