Dr. Vijaykumar Gavit News: भाजप नेते, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित आपल्या विरोधकांवर चांगलेच बरसले. विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी मी राजकारणात येण्याआधी कोणाला दमडाही मिळत नव्हता, असा अजब दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे नंदुरबारच्या राजकारणात नवाब उभारण्याची शक्यता आहे.
डॉ विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत बांधकाम मजुरांना भांडी आणि साहित्याचे वाटप करण्यात आले. नंदुरबार शहरात झालेल्या या कार्यक्रमाला या वस्तू घेण्यासाठी बांधकाम मजुरांची मोठी गर्दी होती. या कार्यक्रमात डॉ गावित यांनी आपल्या विरोधकांचा समाचार घेतला.
भाजप नेते डॉ गावित यावेळी म्हणाले, मी राजकारणात येण्याआधी जनतेला दमडाही मिळत नव्हता. मी सत्तेत आल्यावर लोकांच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू केल्या. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक मदत सुरू केली. घरे बांधण्याचा कार्यक्रम राबवला. त्यामुळे अनेकांचे भले झाले.
मी आदिवासी विकास मंत्री झाल्यावर तातडीने कर्मचारी भरती करण्यात आली. सोळा हजार युवकांना नोकऱ्या देण्यात आल्या. गोरगरीब जनतेला थेट लाभ कसा मिळेल यावर माझा भर राहिला आहे. त्यासाठीच मी काम करत आलो मात्र विरोधकांनी सतत त्याला विरोध केला आहे. सातत्याने माझ्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
संजय गांधी योजनेचा लाभ थेट लोकांना मिळू लागला होता. ही योजना सुरू केल्यावर विरोधकांनी ती बंद पाडली. अशा अनेक योजनांना विरोधक सरकारी योजना म्हणून माझ्या योगदानाला कमी लेखतात. जर सरकारी योजनांमुळेच हे होत असेल तर मी सत्तेत आणि राजकारणात येण्याआधी सरकार आणि सरकारी योजना नव्हत्या का? असा प्रश्न त्यांनी केला.
डॉ. गावित म्हणाले, लोकांना देण्याचे काम करत असतो. माझे विरोधक मात्र जनतेला जे मिळते ते हिसकावण्याचे काम करतात. त्यांच्या या राजकारणाला मी पुरून उरेल. विरोधकांचे राजकारण उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान त्यांनी आपल्या विरोधकांना दिले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे डॉ गावित यांनी तयारी सुरू केली आहे. नंदुरबार शहरात घरोघर जाऊन त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी व्यक्तिगत लाभाच्या साहित्य आणि अन्य वस्तूंचे वितरण सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री डॉ गावित विरुद्ध अन्यविरोधक असे चित्र निर्माण झाले आहे.
महायुतीत भाजप हा प्रमुख पक्ष आहे. शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यात भाजप नेते डॉ गावित आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आमदार रघुवंशी यांच्यात टोकाचे राजकीय मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ गावित यांनी आपल्या विरोधकांना दिलेले आव्हान चर्चेचा विषय ठरले आहे.
---------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.