Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuwanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijaykumar Gavit News : गावित हे तर स्वतःच्या कुटुंबाचे पालकमंत्री होते!

Sampat Devgire

Gavit v/s Raghuwanshi Politics : आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील राजकीय वाद आता अधिक तीव्र झाला आहे. पालकमंत्रिपद जाताच रघुवंशी यांनी गावित यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Shinde Government`s allinace parties are attacked Nandurbar Politics)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याचे नवे पालकमंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राज्य सरकारमधील (Maharashtra Government) घटक पक्षच भाजप (BJP) नेत्यांचे कपडे फाडत असल्याचे दिसून आले.

राज्यातील बारा जिल्ह्यांचे पालकमंत्री नुकतेच बदलण्यात आले. त्यात नंदुरबारच्या राजकारणावर व्यक्तिगत प्रभाव असलेल्या व भाजपचे विजयकुमार गावित यांचे नंदुरबारचे पालकमंत्रिपद काढून त्यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले.

तेव्हापासून नंदुरबारमध्ये भाजपप्रणित एकनाथ शिंदे सरकारमधील अन्य दोन पक्षांच्या नेत्यांनी नंदुरबारमध्ये आनंदोत्सव साजरा केला. डॉ. गावित यांचे पालकमंत्रिपद जाताच शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते गावित यांच्यावर तुटून पडले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.

तळोदा पालिकेच्या अमृत-२ पाणीपुरवठा योजना, नव्याने हद्दवाढ क्षेत्रात विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप नेतेदेखील उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीतच शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, की तळोदा शहर अच्छे-अच्छे को पाणी पिलाता है, त्यामुळे नवे पालकमंत्री ही योजना नक्कीच यशस्वी करतील. पूर्वीचे पालकमंत्री जिल्ह्याचे नव्हे, तर फक्त कुटुंबाचे पालकमंत्री होते. त्यांच्यामुळे मागील काळात नंदुरबार शहराला निधीपासून वंचित राहावे लागले आहे, असा आरोप केला. यापूर्वी जो अन्याय झाला तो आता होणार नाही. त्यासाठी नवे पालकमंत्री सहकार्य करतील, अशी अपेक्षा केली. गावित यांच्यावरील या टीकेने हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT