Lalit Patil Arrested : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Drug Traffickers Lalit Patil News : ललित पाटील 2 ऑक्टोबरला रात्री ससूनमधून पळून गेला होता.
Lalit Patil Arrested News
Lalit Patil Arrested News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पंधरा दिवसांपासून फरार असलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. त्याला चेन्नईमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ललित पाटील 2 ऑक्टोबरला रात्री ससूनमधून पळून गेला होता. साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन ऑक्टोबरला पोलिसांना गुंगारा देऊन ललित पाटील पसार झाला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात ललित पाटील याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललिता भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे यांना नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

Lalit Patil Arrested News
Maratha Kranti Morcha : सदाभाऊंचा डीएनए चेक करण्याची वेळ आली; खोतांवर मराठा ठोक क्रांती मोर्चा आक्रमक

या प्रकरणात राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. त्याला पकडण्याची जबाबदारी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवली होती. ससून रुग्णालयात ललित पाटील उपचार घेत होता.

येथून तो आपले रॅकेट चालवीत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 'ससून'मध्ये ललितला अमली पदार्थ देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल आणि ससूनच्या उपहारगृहातील कामगार रौफ शेख सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

नऊ पोलिस निलंबित

बलकवडे याच्या नाशिक येथील घरावर छाप्यात पोलिसांनी तीन किलो सोने जप्त केले आहे. ललितच्या कुटुंबीयांची चौकशी नाशिक, पुणे पोलिस करीत आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या नेतृत्वाखाली दहा पथके तयार केली होती.

या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यात 2 अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Lalit Patil Arrested News
Dhananjay Munde News : धनंजय मुंडे शेतकऱ्यांना म्हणाले, "तर मी यंदा दिवाळी करणार नाही..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com