Samruddhi Highway Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Smruddhi: ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्गावर वाहनांची गती घटली!

समृद्धी तयार करताना सांगितला होता ताशी १५० कि. मी. वेग प्रत्यक्षात मात्र नव्या नियमानुसार १२० कमाल गती असेल.

Sampat Devgire

नाशिक : राज्यातील बहुचर्चित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून (Nagpur Mumbai Samruddhi Highway) प्रवास करण्यास दुचाकी तसेच तीनचाकी व चारचाकी रिक्षांना परवानगी दिली जाणार नाही, तसेच चारचाकी वाहनांसाठी वेगमर्यादा (Speed limit) किती याविषयी आज वाहातूक विभागाने अधिसुचना काढली आहे. त्यामुळे यापुर्वीच रस्त्याच्या दुर्तफाच्या भिंतीमुळे चर्चेतअसलेल्या या मार्गावरुन दुचाकीसह रिक्षांना परवानगी नसणार हेही स्पष्ट झाले आहे. (Two wheelers & Rikshaw will not be allowed on Samruddhi Highway)

अप्पर पोलीस महासंचालक वाहातूक कुलवंतकुमार सरंग यांनी समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या वेगाच्या अनुषंगाने अधिसुचना प्रसिध्द केली आहे. समृद्धी महामार्गावर ताशी १५० किलोमीटर वेगाने वाहने धावतील, सपाट भागात ताशी १२० किमी व बोगदे, घाटाच्या भागात ताशी १०० किमी वेगाने वाहने चालवता येणार आहेत. अशी वाहनांच्या प्रकारानुसार वेग निश्‍चिती करण्यात आली असून त्या वेगमर्यादेचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाईची तरतूद आहे.

राज्यातील १७ जिल्ह्यांना जोडणाऱ्या या समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार असून नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सात तासांत पुर्ण करता येणार आहे. या महामार्गाच्या उभारणीची जबाबदारी राज्याच्या रस्ते विकास महामंडळाकडे असून हा महामार्ग उभारण्यासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. नागपूर ते कोपरगाव (जि. नगर) पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून या पूर्ण झालेल्या महामार्गावर लवकरच वाहतूक खुली करण्यात येणार आहे. या महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीला होणार असल्याच्याही चर्चा आहे. समृध्दी महामार्गावरुन वाहनांसाठी सपाट भागात, घाटरस्त्यांत व बोगद्यांमध्येही वाहनांची वेगमर्यादा वेगवेगळी असणार आहे.

अशी असणार वेगमर्यादा

चालकासह ८ व्यक्तीची क्षमता असणारी एम १ या प्रकारातील वाहनांसाठी सपाट भागात ताशी १२० किमी व घाट-बोगद्याच्या भागात ताशी १०० किमी वेग मर्यादा असणार आहे.चालकासह नऊ व्यक्तिंपेक्षा अधिक व्यक्तिंची क्षमता असणाऱ्या एम१ व एम ३ या प्रकारांतील प्रवाशी वाहनांसाठी सपाट भागात ताशी १०० किमी व घाट-बोगद्याच्या भागात ताशी ८० किमी वेगमर्यादा असणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सपाट व घाट-बोगद्याच्या भागात ताशी ८० किमी वेगमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT