नाशिक : दसरा (Dasara Rally) मेळाव्यासाठी मुंबईला (Mumbai) जाणाऱ्या महिला आघाडीच्या (Womens wing) पदाधिकाऱ्यांची छेड काढणाऱ्या शिंदे गटाच्या (Eknath Shinde group) मद्यधुंद कार्यकर्त्यांना महिलांनी चोप दिला. या भाडोत्री कार्यकर्त्यांना अद्दल घडविणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) रणरागिणींच्या धाडसाचे कौतुक होत आहे. उपनेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (Eknath Shinde groups workers have missbehave with womens)
पक्षाच्या शालिमार कार्यालयात उप जिल्हा संघटक मनीषा खांडबहाले, पश्चिम विधानसभा संघटक आलका गायकवाड, तालुका संघटक ज्योती भागवत, गायत्री पगार, श्रुती नाईक, शिवसेना महिला संघटक मीना देवकर, सीमा डावखर, भारती पाईकराव, संध्या धूमाळ, पुष्पा राठोड़, मदुरा नाडर, मुक्ता लहाने, गंगू घुगे यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी येथील महिला आघाडीच्या पदाधिकारी मुंबईला जात असताना खर्डी येथे शिंदे गटाच्या मद्यधुंद कार्यकर्त्यांनी महिलांकडे पाहून अश्लिल हावभाव करत दोन वेळा छेड काढण्याचा प्रयत्न केला. ते वारंवार गाडीला ओव्हरटेक करू लागले. त्यामुळे शिवसेनेच्या संतापलेल्या या रणरागीनींनी त्यांना चागंलाच चोप देत अद्दल घडवली.
कोणत्याही महिलेशी गैरवर्तन केलेले शिवसेना कधीच खपवून घेणार नाही हे सर्वांनी लक्षात घावे, असे सुनील बागूल यावेळी म्हणाले. छेड काढणारा कोणीही असला तरी त्याची आम्ही गय करीत नाही, असा संदेश शिवसेनेच्या महिलांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे यांनी यावेळी सांगितले.
...
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या रणरागिनी बसने जात होत्या. यावेळी शिंदे गटाच्या मद्यधुंद बोक्यांनी त्यांना पाहून आश्लिल हावभाव केले. या महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हे सर्व माजलेले बोके आहेत. त्यांतर या महिलांनी गाडी थांबवून शिवसेना स्टाईलने त्यांचं जे काय करायचे आहे, ते केले. या महिलांनी हे काम केले, त्यांचा सत्कार केला पाहिजे, असे सगळ्यांचे मत होते. त्यानुसार आम्ही त्यांचा सत्कार केला.
- सुनिल बागूल, उपनेते, शिवसेना.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.