Drug Mafia Lalit Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Drug Mafia Lalit patil : कर्नाटकात ड्रग्ज साम्राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न फसले!

Drug Mafia Lalit Patil, Drug business expansion in neighboring states-ड्रग्जमाफिया ललित पाटील याने शेजारच्या राज्यांतही आपला व्यवसाय पसरविण्यासाठी आखलेली योजना अटकेमुळे फसली

Sampat Devgire

Drug Mafia Lalit Patil News : ड्रग्ज वाहतुकीसाठी ललित पाटील व त्याच्या सहाकाऱ्यांनी विविध मार्ग शोधून काढले होते. सोलापूर येथील ‘एमडी’ ड्रग्जनिर्मितीद्वारे कर्नाटकात आपले जाळे विस्तारण्याचा प्रयत्न होता. याच दरम्यान त्याला पोलिसांकडून अटक झाल्याने त्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, असे पुढे आले आहे. (Police investigation in banglore and other places over on Drug)

ललित पाटील (Drug) याला मुंबई पोलिसांनी (Police) अटक केल्यावर अद्यापही मुंबई पोलिस त्याच्याकडे तपास करीत आहेत. मात्र, नाशिक (Nashik) येथील कारखान्याशी संबंधित संशयितांच्या तपासानंतर पोलिसांनी गुजरातशी संपर्क असलेले विरार, सोलापूरपासून जवळ असलेल्या बंगळुरू येथेदेखील तपास केला.

यासंदर्भात सोलापूर येथील कारखान्यासह अन्य ठिकाणी दोन वेळा केलेल्या तपासातून नाशिकच्या पोलिसांना मोठे यश मिळाले. हे यश फक्त ड्रग्जचा साठा जप्त करण्यापुरते होते. पोलिसांच्या तपासातून ललित पाटीलला आर्थिक व्यवहारांत साह्या करणारे व अन्य मदत करणारे दोघे मात्र पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनंतरदेखील मोकळे कसे सुटले याची चर्चा सध्या सुरू आहे.

ललित पाटील याला गतवर्षी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो पुणे पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर या साखळीतील दुसऱ्या कडीतील संशयितांकडून मुंबई पोलिसांना नाशिकचा कारखाना सापडला.

यामध्ये ललित पाटील चांगलाच रुळला होता. त्यामुळे त्याला कर्नाटकात ड्रग्ज व्यवसायाचा विस्तार करायचा होता. तसा प्रयत्न त्याने बंगळुरू येथे केला होता. त्यात फारसे यश आले नाही. नाशिकच्या पोलिसांनी येथे जाऊन तपास केला. त्यातून त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यामुळे ललित पाटीलचा शेजारच्या राज्यात ड्रग्ज व्यवसाय विस्तारण्याचा प्रयत्न फसला, असे आढळले आहे.

स्पीकर बॉक्समधून तस्करी

एमडी ड्रग्ससाठी वापरण्यात येणाऱ्या गोदामात पोलिसांना साउंड सिस्टिमसाठी वापरण्यात येणारे स्पीकर सापडले. याच स्पीकर बॉक्सच्या आत एमडी ड्रग्ज लपवून ते नाशिकमध्ये सनी पगारे याच्याकडे पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. या गोदामातून पोलिसांनी एमडी ड्रग्जसाठी लागणारे २२ लाखांचे रासायनिक द्रव्याचे पाच ड्रम, १७५ किलो क्रूड पावडर, एम ड्रायर मशिन, स्पीकर बॉक्स असा ४० लाखांचा कच्चा माल व साहित्य जप्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT