Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार गटात जाण्यास इच्छुकांना अजित पवार गटाकडून दमदाटी? पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप!

Pune Politics : आगामी काळात पुणे शहरात शरद पवार व अजित पवार गटात चांगलीच रस्सीखेच अनुभवायला मिळणार
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Pune News : अजित पवार व शरद पवार गटात सुप्त संघर्ष पुणे शहरात वाढत चालला असून, आगामी काळात एकमेकांची उणी दुणी काढण्याबरोबरच नगरसेवक पदाधिकारी फोडण्याचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटात जाणाऱ्या इच्छुक माजी नगरसेवकांना दमदाटी होत असल्याचा थेट आरोप एका विधानसभा अध्यक्षांनी कार्यकारिणी बैठकीत केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Ajit Pawar
Elvish Yadav Case : 'एल्विश' प्रकरणावरून विरोधक आक्रमक, तर शिंदे-फडणवीसांकडूनही प्रत्युत्तर, म्हणाले...

शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली 27 वी कार्यकारिणी बैठक पुण्यात बोलावली होती. या बैठकीस पदाधिकारी व सर्व सेलचे अध्यक्ष सहभागी झाले होते. या वेळी हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी अनेक माजी नगरसेवक शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत, परंतु अजित पवार गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा थेट आरोप केला.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिष्टमंडळ मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या भेटीला मोदी बागेतील निवासस्थानी गेले होते. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक योगेश ससाणे व माजी उपमहापौर नीलेश मगर यांचाही समावेश होता.

याबाबत हडपसरच्या आमदारांनी अजितदादांकडे तक्रार केल्याने अजितदादांनी फोन करून योगेश ससाणे यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे समोर आले होते. नीलेश मगर रोहित पवार यांचे नातलग असल्याने त्यांच्याबाबत कोणी काही बोलले नव्हते, तर माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी यू टर्न घेत शांत राहणे पसंत केले.

Sharad Pawar, Ajit Pawar
Reshma Bhosale News : अनिल भोसलेंच्या पत्नी रेश्मा भोसले यांना तोतया 'ईडी' अधिकाऱ्याने मागितली खंडणी!

पुण्यात आज शरद पवार गटाच्या कार्यकारिणीची मासिक बैठक होती, या बैठकीत विधानसभा अध्यक्ष आपल्या भागातील कार्याचा अहवाल देत होते हडपसरचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी आपल्या मनोगतमध्ये काही माजी नगरसेवक शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत, लगेच हडपसरच्या नेत्यांकडून तक्रारी केल्या जातात व नेत्यांकडून दमदाटी केली जाते राजकारणात हे योग्य नाही, असे म्हणत तक्रारीचा पाढा वाचला.

...तर अशांची गय केली जाणार नाही - प्रशांत जगताप

प्रशांत जगताप यांनी आपल्या भाषणामध्ये पदाधिकाऱ्यांना सांगितले की, विनाकारण राजकारण करू नये, आपल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस वाढेल व शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांना मानणारा वर्ग जास्तीत जास्त पक्षात घेण्यासाठी काम करा. पक्षात राहून फक्त पद घेऊन मिरवायचे आणि काम केले नाही तर अशांची गय केली जाणार नाही, त्यांना पद मुक्त केले जाईल आणि पक्षासाठी वेळ देतात त्यांना सर्व प्रकारची ताकद दिली जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com