SP Sachin Patil
SP Sachin Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News: टोलसाठी पोलिस अधीक्षकांचा ताफाच अडवला!

Sampat Devgire

पिंपळगाव बसवंत: (Pimpalgaon Toll Plaza) नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी चक्क पोलिस अधीक्षकांचाच (Nashik Police superitendent) ताफा अडविल्याने कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा पुन्हा एकदा समोर आला. याप्रकरणी पिंपळगाव पोलिस (Police) कसून चौकशी करीत आहेत. (Toll employees stop SP`s vehicles for Toll & behave rude)

याबाबत माहिती अशी, की पोलिस अधीक्षक सचिन पाटील शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मालेगावहून नाशिकच्या दिशेने जात होते. श्री. पाटील यांचे वाहन पिंपळगाव टोल नाक्यावर आले असता येथे शासकीय वाहन जाण्यासाठी स्वतंत्र लेन खुली नव्हती. त्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या वाहनाने दुसऱ्या लेनमध्ये प्रवेश केला.

त्यानंतरही शासकीय वाहनाचा ताफा पुढे जाण्यासाठी कुठलीच व्यवस्था करण्यात आली नाही. बराच वेळ होऊनही येथील कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्याने अखेर सचिन पाटील यांनी स्वत: वाहनाबाहेर येत टोल कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. तर येथील ढिसाळ नियोजन पाहून व्यवस्थापकाचीही कानउघाडणी केली. दरम्यान, पिंपळगाव पोलिस ठाण्याशी पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्वत: संपर्क साधल्यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत श्री. पाटील यांचे वाहन नाशिककडे मार्गस्थ झाले होते.

कामगारांची चौकशी

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचे वाहन अडविल्यानंतर पिंपळगाव पोलिसांनी टोलवरील दहा ते बारा कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. तसेच, ज्या लेनमध्ये टोलकडून निष्काळजीपणा झाला, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT