Manjula Gavit: एकनाथ शिंदेंकडून मंजुळा गावित यांना ५० कोटींचे गिफ्ट

पाठपुराव्यामुळे पुरवणी अर्थसंकल्पात साक्री तालुक्यासाठी ५० कोटी मंजूर झाले.
Manjula Gavit With CM Eknath Shinde
Manjula Gavit With CM Eknath ShindeSarkarnama

पिंपळनेर : आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या (State Government) जुलै २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पात (Budget) साक्री (Dhule) तालुक्यातील रस्ते विकासासाठी ५० कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यानिमित्ताने शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत शिंदे गटात सामील झालेल्या आमदार मंजुळा गावित यांना एकप्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांनी ५० कोटींच्या विकासनिधीचे गिफ्ट दिले आहे. (Manjula Gavit`s follow up success for funds)

Manjula Gavit With CM Eknath Shinde
पुण्याचा पालकमंत्री ठरला का? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले...

साक्री मतदारसंघाच्या आमदार गावित तसेच त्यांची पती व शिवसेनेचे धुळे जिल्हाप्रमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात सुरत व गुवाहाटी मार्गे झालेल्या बंडात भाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी संताप व्यक्त केला होता. सर्व पदाधिकारी शिवसेनेतच असल्याचे जाहीर केले होते. यामध्ये गावित यांचे पद देखील गेले. त्यामुळे मतदारसंघात शिवसेनेने त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण केले होते. ५० कोटींचा निधी मिळाल्याने गावित यांना दिलासा मिळाला आहे.

Manjula Gavit With CM Eknath Shinde
सुरेश खाडेंनी धाडस दाखवले... `झेंगट` मागे लागणारा बंगला घेतला..

पुरवणी अर्थसंकल्पात साक्री तालुक्यातील रस्त्यांच्या कामांची सुधारणा करणे यासाठी साक्री सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री. बिरारीस, सा.बा. उपविभाग पिंपळनेरचे उपअभियंता श्री. कुवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्यासह झालेल्या बैठकीत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार मंजुळा गावित यांनी दिल्या होत्या. साक्री मतदार संघातील बिगर आदिवासी क्षेत्रासाठी सात रस्त्यांच्या कामांसाठी ४२ कोटी रुपये तर साक्री तालुक्यातील आदिवासी क्षेत्रासाठी (पिंपळनेर भाग) पाच रस्त्यांच्या कामांसाठी आठ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

बिगर आदिवासी क्षेत्र नंदुरबार- साक्री-मनमाड प्र. रामा आठ किमी, प्रकाशा- छडवेल- दहिवेल सामोडे रस्ता भाग आमखेल ते ब्राम्हणवेल, प्रकाशा-छडवेल- दहिवेल सामोडे रस्ता भाग ब्राम्हणवेल ते जांभोरा, प्रकाशा-छडवेल-सामोडे, प्रकाशा छडवेल-सामोडे रस्ता भाग रामा सात किमी, नवापूर - पिंपळनेर रस्ता रामा १४ किमी, नवापूर-पिंपळनेर रस्ता रामा १४ किमीची रस्ता सुधारणा करणे या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com