Chandrakant Raghuwanshi & Dr. Vijaykumar Gavit
Chandrakant Raghuwanshi & Dr. Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar APMC Election: शिंदे गटाने भाजपच्या विजयकुमार गावितांना धूळ चारली!

Sampat Devgire

APMC Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या निवडणुकांत अतिशय रंजक होते. एकनाथ शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रस्थापित भाजप नेते आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना जमिनीवर आणले. गेले काही दिवस शहरातील या दोन्ही नेत्यांत विस्तवही जात नव्हता. कारण होते, नगरपालिकेची सत्ता. आता गावित यांची त्यात राजकीय परिक्षा होईल. (Shinde Group`s Chandrakant Raghuwanshi keep his domination in APMC)

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा म्हणजे आदिवासी (Trible) विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) हे समिकरण आहे. त्यात भाजप (BJP) पक्ष देखील दुय्यम मात्र गावित यांचे नेतृत्व महत्त्वाचे. या प्रतिमेला बाजार समित्यांच्या निवडणुकीत (APMC election) एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde) चंद्रकांत रघुवंशी यांनी तडा दिला. अन्यत्र देखील असेच चित्र राहिले.

जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा या सहा बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्यात नंदुरबार आणि शहादा येथे प्रस्थापित नेत्यांना मतदारांनी धडा शिकवला. नंदुरबारला शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी, नवापुरला काँग्रेसचे सुरुपसिंग नाईक यांचे सुपुत्र आमदार शिरीष नाईक, शहादा येथे अभिजीत पाटील आणि जयपाल रावल यांची सत्ता आली. (Political Web Stories)

धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा या तीन बाजार समित्या बिनविरोध झाल्या. त्यात धडगाव बाजार समिीत शिंदे गटाचे विजय पराडके, शिवसेना ठाकरे गटाचे गणेश पराडके आणि काँग्रेसचे के. सी. पाडवी यांच्या समर्थकांनी परस्पर सहमतीने जागावाटप करून सत्ता आपल्याकडे ठेवली. अक्कलकुवा येथे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी भाजप, शिवसेना यांना वाटेकरी करीत १६ जागा बिनविरोध तर निवडणुकीत दोन अशा सर्व १८ जागांवर वर्चस्व कायम ठेवले. तळोदा येथे भाजपचे राजेश पाटील यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेत बिनविरोधचा यशस्वी प्रयोग केला.

बाजार समित्यांच्या या निवडणुकीत राजकीय एक्स-रे केल्यास जिंकलेले व पराभूत बहुतांश नेते पुर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत. भाजप सत्तेत आल्यानंतर गेल्या दहा वर्षात जी पडझड झाली, त्यात अनेकांनी भाजपची वाट धरली. जे सध्या काँग्रेस पक्षात आहेत, त्या सुरुपसुंग नाईक, के. सी. पाडवी ही मंडळी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळे अनेक नेत्यांकडे भाजपच्या माध्यमातून सत्ता व पदे असली तरीही या पक्षाचे वर्चस्व आहे, असे विधान धाडसाचेच ठरेल. एकंदर सर्वच कार्यकर्त्यांसाठी राजकीय गोंधळाची स्थिती आहे.

बाजार समित्यांच्या निवडणुकीचे पडसाद येत्या नगरपालिका निवडणुकांवर होणार हे मात्र नक्की. आगामी काळात नंदुरबार, नवापुर, शहादा आणि तळोदा नगरपालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील.

नगरपालिका निवडणुकांवर बाजार समित्यांत नेत्यांनी बसवलेल्या घडीचा नक्कीच परिणाम होईल. त्यात गेले वर्षभर भाजप आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नंदुरबार नगरपालिकेत प्रत्येक विषयावर वाद होत आहे. सध्या भाजप व शिंदे गट दोन्ही राज्यात सत्तेत आहेत. त्यामुळे गावित आणि रघुवंशी दोघांनाही सत्तेचे पाठबळ असल्याने आगामी राजकारण अतिशय टोकदार होऊ शकते. (Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT