Sharad Pawar : पवारांच्या निर्णयाचे देशाच्या राजकारणावर परिणाम होतील!

भाजप नेते मधुकर पिचड म्हणाले, शरद पवार चणाक्ष आहेत, विचारपुर्वक वागतात.
Madhukar Pichad & Sharad Pawar
Madhukar Pichad & Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Madhukar Pichad News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत. त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, त्याचा राज्याच्या व देशाच्या राजकारणावर परिणाम होईल, असे माझे मत आहे, असे भाजप नेते व माजी मंत्री मधुकर पिचड यांनी म्हटले आहे. (BJP leader Madhukar Pichad comments on Sharad pawar decision)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे झालेल्या एका कार्यक्रमात पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचे पडसाद राज्याच्या (Maharashtra) राजकारणावर उमटले आहेत. याबाबत भाजप (BJP) नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) बोलले.

Madhukar Pichad & Sharad Pawar
Abdul sattar News : अब्दुल सत्तार अधिकाऱ्यावर भडकले, शेतकऱ्यांशी नीट वागा!

शरद पवार यांनी १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यावेळी श्री. पिचड हे काँग्रेस पक्षात होते. ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. त्यांनी देखील तेव्हा दोन आठवड्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत श्री. पवार यांच्या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता.

आज श्री. पिचड नाशिकला होते. यावेळी पवार यांच्या निर्णयाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी सध्या भाजप मध्ये आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय घडते, यावर प्रतिक्रीया देणार नाही. तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र श्री. पवार हे देश पातळीवर काम करणारे प्रमुख नेते आहेत. ते जो काही निर्णय घेतील त्याचे राज्याच्या व देशाच्या राजकारणावर परिणाम होतील. याबाबत ते अत्यंत विचारपूर्वक ठरवतील. तसे त्यांनी केले असेलच.

Madhukar Pichad & Sharad Pawar
Dhule APMC Politics: काँग्रेसने भाजप खासदार सुभाष भामरेंचा करेक्ट कार्यक्रम केला!

श्री. पवार हे कधीही घाई गडबडीत काही निर्णय घेतील असे आपल्याला वाटत नाही. ते देश पातळीवर काम करीत आहेत. आज त्यांच्यासारखा प्रमुख नेता काही निर्णय घेत असेल तर त्याचा परिणाम केवळ त्या पक्षावर नव्हे तर देशाच्या राजकारणावर देखील निश्चितच होईल. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी काय निर्णय घ्याव, किंवा पुढे काय होईल याबाबत मला काहीही माहिती नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com