Ashok Kharat ED case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat ED case : 'ED'चा ससेमिरा वाढला; अशोक खरातच्या ताब्यासाठी न्यायालयात अर्ज

ED moves special PMLA court seeking custody of Nashik-based Ashok Kharat in connection with a financial investigation : नाशिक भोंदू अशोक खरात याचा ताबा मिळवण्यासाठी ईडीने विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावर सहा मे रोजी सुनावणी होणार आहे.

Pradeep Pendhare

Breaking News Nashik ED : नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचा ताबा मिळवण्यासाठी 'ईडी'ने हालचाली सुरू केल्या आहेत. 'ईडी'ने विशेष 'पीएमएलए' न्यायालयात धाव घेतली आहे. अशोक खरात याचा ताबा मिळावा, यासाठी 'ईडी'ने विशेष न्यायालयात केलेल्या अर्जावर सहा मे रोजी सुनावणी होणार आहे.

न्यायालयातील या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. अशोक खरात याचा 'ईडी'ने ताबा मिळाल्यास, त्याचा संपर्क असलेले राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी काय होईल? यावर चर्चा रंगल्या आहेत.

अशोक खरात (Ashok Kharat) हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून, तो नवव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे. खरातविरोधात धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक-अध्यात्मिकतेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणे, खंडणी उकळणे, आर्थिक फसवणूक करणे, खंडणीसाठी रॅकेट चालवणे, तसेच अनेक बँक आणि पतसंस्थेतील खात्यांमार्फत 70 कोटी रूपयांपेक्षा अधिक बेनामी रक्कम फिरवल्याचा ठपका आहे.

अशोक खरात याचा शिर्डी (Shirdi) पोलिसांनी भांडाफोड केल्यानंतर, हे प्रकरण राज्यात गाजत आहे. आतापर्यंत 16 पेक्षा अधिक गुन्हे त्याच्याविरोधात दाखल झाले आहेत. आता नवव्या गुन्ह्यात अशोक खरात पोलिस कोठडीत आहेत. विशेष पोलिस पथकाकडून गुन्ह्यांचा तपास होत आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली राजकीय अन् प्रशासकीय पातळीवर हितसंबंध, महिलांचे शोषण, त्यातून उभी केलेली कोट्यवधीची माया विशेष पोलिस पथकाच्या समोर आली आहे.

जमीन व्यवहारात गैरकायद्याने खरेदी-विक्री, खंडणीसाठी रॅकेट चालवणे, हवाला, बेकायदेशीर सावकारकी, असे अनेक प्रकार विशेष पोलिस तपासात समोर आले आहे. शिर्डीतील समता नागरी पतंसस्थेच्या शाखेत आणि नाशिकच्या जगदंबा पतसंस्थेत, वारसदार म्हणून अशोक खरात याची शेकडो खाती आढळली.

या बँक खात्यावर, कोट्यवधींचा व्यवहार झाल्याच विशेष पोलिस तपासात समोर आलं आहे. याशिवाय त्याने त्याच्या अंधभक्तांना कोट्यवधींचा चुना लावला आहे. यातून त्याने कोट्यवधींचा माया जमवली. त्याचा मुलांनी बाबा रोज पैशाचा बॅगा भरून घरी आणायचे, असे म्हटलं होतं. पत्नी कल्पना खरात हिच्या नावावर राज्यातील अनेक भागात स्थावर मालमत्ता खरेदीचे व्यवहार केल्याचे तपासात समोर आलं आहे.

या व्यवहारांमध्ये कुठेतरी राजकीय हितसंबंध देखील तपासात समोर आले आहे. याशिवाय खरातचे प्रशासकीय पातळीवर असलेले संबंधांची देखील चर्चा होते. यातून काही अधिकारी देखील अडचणीत आले आहेत. राज्यभरात संपर्क असलेल्या अशोक खरातचे जाळे खणून काढण्यासाठी आता ईडी सरसावली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणात ईडी कारवाईचे संकेत दिले होते. ईडीने प्राथमिक तपास सुरू केला असून, आतापर्यंत खरात पती-पत्नीच्या काही बँक खाती माहिती घेतली आहेत. तसेच काही खाती देखील गोठावली आहेत. खरातविरोधात 'मनी लाॅड्रिंग'चा देखील गुन्हा दाखल झालेला आहे. याचा देखील तपास ईडीमार्फत होणार आहे.

अशोक खरात याने भक्तांच्या पैशांवर 21 देशांमध्ये भ्रमंती केली आहे. या भ्रमंतीमध्ये त्याने तिथं काही व्यवहार केले आहेत का, याची देखील चौकशी होणार आहे. या सर्व व्यवहारांवर ईडीने अशोक खरात याचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ईडी ज्यापद्धतीने अशोक खरात याचा ताबा मागत आहेत, आणि प्राथमिक तपास सुरू केला आहे, त्यावरून ईडी कारवाईत अनेक मोठे खुलासे होण्याची चिन्हं आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT