Womens atrocity
Womens atrocity Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिक्षण विभाग बदनाम; आधी लाचखोरी आता महिलेवर अत्याचार?

Sampat Devgire

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या (ZP) शिक्षण विभागात बजबजपुरी कमी होण्याची चिन्हे नाहीत. यापूर्वी येथील शिक्षणाधिकारी श्रीमती वैशाली वीर- झनकर (Vaishali veer-Zankar) यांनी लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आता याच विभागातील उच्च पदस्थ प्रविण अहिरे यांनी महिलेवर अत्याचार (Women Atrocity) केल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे शिक्षण विभागात चाललय तरी काय? असा उद्वीग्न प्रश्न केला जात आहे.

`मी शिक्षण विभागात कार्यरत आहे, याची मला लाज वाटते` असे विधान या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जाहीरपणे केले होते. त्याला श्रीमती वैशाली वीर- झनकर या अधिकाऱ्याने एका शिक्षण संस्था चालकाकडून सहा लाखांची लाच चालक व मध्यस्थ शिक्षकाच्या माध्यमातून स्विकारल्याचा आरोप होता. त्याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या अधिकारी बडतर्फ आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करत फसवणूक केल्याबद्दल अंबड पोलिस ठाण्यात संशयित प्रवीण अहिरे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित अहिरे हे शिक्षण विभागातील उच्च अधिकारी असल्याचे समजते.

या बाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित यांची सदर महिलेशी २०१६ ला ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. मैत्रीतून प्रेमात आणि प्रेमातून प्रेमसंबंधात रूपांतर झाले. अहिरे यांनी पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवले. मात्र लग्न केले नाही.

पीडितेने लग्नासंबंधी विचारले असता संशयित आहिरे यांनी लग्नास नकार दिला, यावेळी आपली फसवणूक झाली असल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आल्यानंतर या महिलेच्या फिर्यादीवरून श्री अहिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT