धुळे : शहरातील (Dhule) आझाद नगर, हजारखोली, अंबिका नगर, माणिक नगरसह इतर भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या समस्यांमुळे नागरिक आमच्या घरांवर मोर्चे (Morcha) आणत आहेत, आम्हाला जाब विचारत आहे, काहीजण तर शिविगाळदेखील (Abusive words) करत आहेत असे म्हणत या समस्या तातडीने सोडवा अन्यथा सर्वपक्षीय नगरसेवक (Corporators) आपल्या दालनात आंदोलन करू असा इशारा समाजवादी पक्षासह (Samajwadi Party) इतर पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांना दिला. (Dhule News Updates)
गेल्या काही दिवसांपासून शहरातील आझादनगर, हजार खोली, अंबिकानगर, माणिक नगर, मौलवीगंज, देवपूर, मोगलाई, जामचा मळा, दसेरा मैदान या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पवित्र रमजान महिना सुरू असताना या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांमुळे नागरिक आम्हाला जाब विचारत आहेत.
वीज नसल्याने पाणीपुरवठ्यांचे नियोजनदेखील चुकत आहे. तापी पाणीपुरवठा योजनेवरील पंपसेट वारंवार खराब होतात. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी शहरातील पथदिवे बंद आढळून येतात तर काही ठिकाणी दिवसाढवळ्या पथदिवे सुरू असतात.
अस्वच्छतेची समस्या जैसे थे
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभागात तसेच संपूर्ण धुळे शहरात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्वयंभू कंपनीने काही भागात स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. मात्र, आमच्या प्रभागात अद्यापही अस्वच्छतेची समस्या सुटलेली नाही. काही भागात काम सुरू झाले आहे. मात्र आमच्या प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने प्रभागातील नागरिक आम्हाला जाब विचारतात.
दालनात आंदोलन करू
या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा सर्वपक्षीय नगरसेवकांना आपल्या दालनात आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी दिला. मागणीचे निवेदन आयुक्त देविदास टेकाळे यांना दिले. नगरसेवक अमीन पटेल, मुख्तार मन्सुरी, उमेर अन्सारी, सईद बेग, वसीम बारी तसेच सलीम टंकी, लल्लू शेठ, शब्बीर मन्सुरी, अबुलास, युसुफ मुल्ला, अब्दुल गनी वसीम मंत्री, नासिर पठाण, सद्दाम मुल्ला आदींनी हे निवेदन दिले.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.