Eknath Khadse & Jitendra Awhad
Eknath Khadse & Jitendra Awhad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे फिरकलेही नाही!

Sampat Devgire

जळगाव : जळगाव (Jalgaon) आणि नाथाभाऊंचे (Eknath Khadse) हे एक राजकीय समिकरण आहे. त्याला अनेक कंगोरे देखील ऐहेत. त्यामुळे नाथाभाऊंच्या पक्षाचा नेता आला आणि एकनाथ खडसे तिकडे फिरकलेच नाहीत, तर त्याची चर्चा तर होणारच. गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे फैजपुर येथे आले होते. मात्र श्री. खडसे कार्यक्रमाला नव्हते, यानिमित्ताने त्याची चर्चा सुरु झाली आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे कार्यकर्त्यांने केलेला नवस फेडण्यासाठी आव्हाड यांनी फैजपूर येथील हजरत बाबा दुलदुल शहा वली यांच्या दर्ग्यावर चादर चढविण्याचा कार्यकर्त्याने केलेला नवस त्यांनी पूर्ण केला.

दरम्यान या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार शिरीष चौधरी यांची उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT